दुर्मिळ देशी वाण बियाणे  निर्मिती बँक स्थापन करणार  Seeds of rare native varieties Will set up a production bank 
मुख्य बातम्या

दुर्मिळ देशी वाण बियाणे  निर्मिती बँक स्थापन करणार 

आगामी काळात महिलांच्या पुढाकारातून दुर्मिळ देशी वाण बियाणे बँक स्थापन करण्याचा मानस असल्याचे प्रतिपादन शिरोळच्या श्री दत्त सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी केले.

टीम अॅग्रोवन

कोल्हापूर : निरोगी व तंदुरुस्त शरीरासाठी चांगला व सकस आहार महत्त्वाचा आहे. त्यामुळे देशी वाणाचे बियाणे संकलित करून त्यांची लागवड करण्यासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा. आगामी काळात महिलांच्या पुढाकारातून दुर्मिळ देशी वाण बियाणे बँक स्थापन करण्याचा मानस असल्याचे प्रतिपादन शिरोळच्या श्री दत्त सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी केले.  स्व. डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील सोशल फाउंडेशनच्या वतीने शेडशाळ (ता. शिरोळ) येथील महिला बचत गटांच्या महिलांची देशी वाण बियाण्यांची लागवड व संगोपन या विषयी दत्त साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर बैठक झाली. त्यावेळी पाटील बोलत होते.  बैठकीत आगामी काळात देशी वाण बियांची बँक स्थापन करण्याबाबत महिलांनी सर्वानुमते मान्यता दिली. शेडशाळमधील १३ बचत गटांमधील महिला उपस्थित होत्या. या वेळी विविध प्रकारचे ४२ देशी वाण बिया उपलब्ध करण्यात आले. महिलांना बियाणे वाटप करून चांगल्या पद्धतीने लागवड व संवर्धन करण्याबाबत विशेष सूचना देण्यात आल्या. या उपक्रमात महिला उत्स्फूर्तपणे सहभाग घेत असून, हा प्रयोगशील देशी वाण बियाणे लागवड पॅटर्न यशस्वी करणार असल्याचे शमा पठाण यांनी सांगितले.  या वेळी जयश्री शिरढोणे, आक्काताई मगदूम, मालन आवळे, सुरेखा मानकापुरे, सुनिता कोळेकर यांच्यासह दत्त कारखान्याचे संचालक भैय्यासाहेब पाटील, कृषी विभागाचे ए. एस. पाटील, रवी पवार, काका चौगुले, संजय मगदूम, सुरेश केरीपाळे, महेश चौगुले, ऋषिकेश मिठारी, रावसाहेब चौगुले, दगडू माने आदी उपस्थित होते. अशोक शिरढोणे यांनी आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Maharashtra 2026 : दुष्काळाच्या स्थितीत शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांची ग्वाही

Maharashtra Cabinet Decisions: साखर कारखाने, ऊस शेतकऱ्यांना दिलासा; ७५० कोटींच्या सॉफ्ट लोन धोरणाला मंजुरी, मुख्यमंत्र्यांची माहिती

Dam Water Storage Update: यावल, रावेरातील प्रमुख सिंचन प्रकल्प भरले

Maharashtra Rain Update: विदर्भातील चार जिल्ह्यांत पावसाचा अंदाज; उर्वरित राज्यात उघडीप कायम

Rainfall Deficit: पावसाअभावी राज्यात चिंताजनक स्थिती; शेतकरी- शेतमजुरांच्या हिताचा सरकार विचार करणार : सहकारमंत्री बाबासाहेब पाटील

SCROLL FOR NEXT