कोल्हापुरात बियाण्यांची उपलब्धता होण्यास प्रारंभ 
कोल्हापुरात बियाण्यांची उपलब्धता होण्यास प्रारंभ  
मुख्य बातम्या

कोल्हापुरात बियाण्यांची उपलब्धता होण्यास प्रारंभ 

टीम अॅग्रोवन

कोल्हापूर: लॉकडाऊनमुळे खतांच्या उपलब्धतेबाबत अडचणी येत असल्या तरी बियाणे मात्र मुबलक प्रमाणात उपलब्ध होइल अशी शक्‍यता आहे. लॉकडाऊनमध्ये खते व बियाणे विक्रेत्यांना मुभा देण्यात आली होती. यामुळे सुरवातीचे काही दिवस वगळता गेल्या पंधरा दिवसांहून अधिक काळ निविष्ठा केंद्रे सुरु आहेत. यामुळे खते व बियाणांची वाहतूक सुरळीत असल्याचे जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने स्पष्ट केले. खरीपासाठी काही कंपन्यांचे बियाणे लांबून येत असल्याने थोडी फार अडचण वगळता बियाणे वेळेत मिळण्याची शक्‍यता आहे.  लॉकडाऊनच्या काळात सरकारने बियाणे निर्मितीला प्रतिबंध न केल्याने ज्या कंपन्यांकडे वाहतूक व्यवस्था चांगली आहे. त्या कंपन्यामार्फत जिल्ह्यात बियाणांची उपलब्धता तात्काळ होवू शकते. बियाणामुळे पेरण्या रखडू नयेत यासाठी कृषी विभागा प्रयत्न करीत आहे.  जिल्ह्याला सुमारे 37 हजार क्विंटल बियाणांची गरज असते. आतापर्यंत मागणीच्या पंधरा टक्केपर्यंत बियाणे उपलब्ध झाले आहे. येत्या पंधरा दिवसात बियाणे गतीने उपलब्ध होण्याची शक्‍यता असल्याचे कृषी विभागाच्या सुत्रांनी सांगितले. जसा वळवाचा पाऊस होइल व मशागतींना वेग येइल तशी टप्प्याने बियाण्याची मागणी होत असते. सध्या अनेक ठिकाणी वळीव पाऊस झाला आहे. यामुळे मशागतीही सुरु आहेत. परिणामी पंधरा मे पासून बियाणांची मागणी वाढण्याची शक्‍यता आहे. यादृष्टीने नियोजन सुरु असल्याचे कृषी विभागाचय सुत्रांनी सांगितले.  जिल्ह्यात प्रामुख्याने भात, सोयाबीन आदि पिके खरीप हंगामात जादा प्रमाणात घेतली जातात. शेतकऱ्यांना ज्या जातीचे बियाणे हवे आहे त्याची मागणी कृषी निविष्ठाधारकांनी अगोदरच नोंदविली होती. यानुसार हे बियाणे केंद्रांमध्ये हळूहळू उपलब्ध होत आहे. महाबीज बरोबर खासगी कंपन्यांचे बियाणेही अनेक ठिकाणी शिल्लक असल्याने त्याची टंचाई भासणार नसल्याचे कृषी विभागातून सांगण्यात आले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

Kharif Sowing : साडेसात लाख हेक्टरवर जिल्ह्यात खरिपाचा पेरा

Shaktipeeth mahamarg : 'रस्त्यांवरच्या लढाईची शेतकऱ्यांनी तयारी करावी', शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची एकजूठ

SCROLL FOR NEXT