loan waiver scheme
loan waiver scheme 
मुख्य बातम्या

दुसऱ्या यादीत २२ लाख शेतकऱ्यांचा समावेश 

टीम अॅग्रोवन

मुंबई: ठाकरे सरकारच्या महत्त्वाकांक्षी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी शनिवारी (ता. २९) जाहीर करण्यात आली आहे. या यादीत राज्यातील २८ जिल्ह्यांतील २१ लाख ८२ हजार शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांचा समावेश आहे. दरम्यान, ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहिता लागू असल्याने सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचा या यादीत समावेश नसल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाने स्पष्ट केले आहे. 

ठाकरे सरकारने ज्या शेतकऱ्यांचे पीककर्ज दोन लाख रुपयांपर्यंतचे आहे, त्या शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करण्याची घोषणा नागपूरमध्ये पहिल्या अधिवेशनात केली होती. त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. पहिल्या यादीत ६८ गावांतील १५ हजार ३५८ शेतकऱ्यांचा समावेश होता. प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावांचा यामध्ये समावेश होता. योजनेअंतर्गत सुमारे ३६ लाख ४५ हजार शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल अशी अपेक्षा राज्य सरकारला आहे. त्यापैकी ३४ लाख ९८ हजार शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांची माहिती राज्य शासनाच्या पोर्टलवर अपलोड झाली आहे. त्यापैकी २१ लाख ८२ हजार शेतकऱ्यांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या शेतकऱ्यांना सुमारे चौदा हजार कोटींची कर्जे माफ होतील असा अंदाज आहे, त्यासाठीची आर्थिक तरतूद राज्य सरकारने गेल्याच आठवड्यात करून ठेवली आहे. राज्य शासनाने आतापर्यंत सुमारे २५ हजार कोटी रुपये शेतकरी कर्जमाफीसाठी उपलब्ध करून दिले आहेत. 

आधार प्रमाणीकरण आवश्‍यक  आधार प्रमाणीकरण झाल्यानंतर कर्जाची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. आतापर्यंत ७२ हजार ९४७ कर्जखात्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे. आधार प्रमाणीकरण झाल्यानंतर व्यापारी बँका २४ तासांमध्ये आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका ७२ तासांमध्ये संबंधित लाभार्थी शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर कर्जमाफीचे लाभ देणार आहेत. 

१५ जिल्ह्यांतील संपूर्ण शेतकऱ्यांचा समावेश  दुसऱ्या यादीत राज्यातील २८ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचा समावेश आहे. १५ जिल्ह्यांतील संपूर्ण शेतकऱ्यांचा समावेश आहे, तर १३ जिल्ह्यांतील अंशतः यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. आगामी काळात राज्यात होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना तूर्तास कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. त्यांचा या दुसऱ्या यादीत समावेश नाही. त्यांना २९ मार्चनंतर निवडणुका संपल्यानंतर योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT