Scientists due to the science package Approach: Dr. Dhawan
Scientists due to the science package Approach: Dr. Dhawan 
मुख्य बातम्या

विज्ञान संकुलामुळे वैज्ञानिक दृष्टिकोन मिळेल ः डॉ. ढवण

टीम अॅग्रोवन

परभणी ः ‘‘कृषी विद्यापीठात उभारण्‍यात येणाऱ्या विज्ञान संकुलामुळे मराठवाड्यातील शालेय विद्यार्थ्‍यांमध्‍ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होण्‍यास मदत होईल. यातूनच जागतिक कीर्तीचे शास्‍त्रज्ञ घडतील’’, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांनी केले.

स्‍वातंत्र्याचा अमृत महोत्‍सव आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे सुवर्ण महोत्‍सवी वर्षानिमित्त वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि परभणी ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीतर्फे  राष्ट्रीय विज्ञान दिनी सोमवारी (ता.२८) ‘विज्ञानवारी २०२२ चे आयोजन करण्यात आले.

स्‍वागताध्‍यक्ष डॉ. राहुल पाटील, जिल्हाधिकारी आंचल गोयल, जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, परभणी अॅस्‍ट्रॉनॉमिकल सोसायटीचे अध्‍यक्ष डॉ. रामेश्‍वर नाईक, उपाध्यक्ष पी. आर. पाटील, शिक्षणाधिकारी आशा गरुड, सुधीर सोनूनकर, प्रा. सुनील मोडक आदी उपस्थित होते.

गोयल म्हणाल्या, ‘‘शास्‍त्रज्ञांनी अथक परिश्रमाने कोरोना रोगावर प्रभावी लस निर्माण केली. त्‍यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखू शकलो. ही किमया विज्ञानाने केली.’’

डॉ. पाटील म्‍हणाले, ‘‘विज्ञान संकुलासाठी राज्‍य शासनाने ११ कोटी रुपयांचा निधी दिला. या विज्ञान संकुलामुळे शालेय विद्यार्थ्‍यांना आंतरराष्‍ट्रीय दर्जाचे व्‍यासपीठ उपलब्‍ध होईल.’’  नाहेप प्रकल्‍पाच्‍या परिसरात  विभागीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्‍यात आले. यात तांबट पक्षाविषयी व जैवविविधता माहितीपट दाखविण्‍यात आला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing : सांगली जिल्ह्यात अडीच लाख हेक्टरवर होणार खरिपाचा पेरा

Jal Jivan Mission : निधी खर्च केला, पण गावांत पाणीच नाही

Maharudra Mangnale : कडूनिंबांशी दोस्ती ! : महारुद्र

Illegal Cotton Seed : ३१ लाखांचे अवैध एचटीबीटी कापूस बियाणे जप्त

Food Safety India : एफएसएसएआयचा 'कॅल्शियम कार्बाइड'च्या वापराबाबत इशारा; वापर टाळण्याच्या केल्या सूचना

SCROLL FOR NEXT