Schemes of the Department of Agriculture Released on the wind: Dr. Bonde 
मुख्य बातम्या

कृषी खात्याच्या योजना  वाऱ्यावर सोडल्या ः डॉ. बोंडे 

राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसोबत सरकारचा संवाद नसल्यामुळे कृषी खात्याकडील अनेक योजना वाऱ्यावर सोडण्यात आल्या आहेत.

टीम अॅग्रोवन

पुणे ः राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसोबत सरकारचा संवाद नसल्यामुळे कृषी खात्याकडील अनेक योजना वाऱ्यावर सोडण्यात आल्या आहेत. त्याचा फटका लाखो शेतकऱ्यांना बसत असल्याने वेळीच हस्तक्षेप करावा, अशी मागणी माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी कृषी आयुक्तांसमवेत झालेल्या चर्चेत केली.  भाजपच्या किसान मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री असलेल्या डॉ. बोंडे यांनी कृषी खात्यातील विविध समस्यांचा तपशील कृषी आयुक्त धीरज कुमार यांच्याकडे सादर केला. ‘‘महसूल व कृषी अशा दोन खात्यांत अजिबात समन्वय नाही. कृषी सहायकांनी महाडीबीटी व पोकराच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा घेतला आहे. दुसऱ्या बाजूला महसूल विभागाच्या असहाकार्यामुळे शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधीचे पैसे मिळालेले नाहीत,’’ अशी तक्रार करण्यात आली आहे.  पीककापणी प्रयोग पीकविम्यासाठी महत्त्वाचे असतात. या पूर्वी ६० टक्के प्रयोग महसूल, तर २०-२० टक्के प्रयोग अनुक्रमे ग्रामविकास व कृषी विभागाकडून केले जात होते. आता ६० टक्के प्रयोग कृषी विभागाकडे देण्यात आल्याने कर्मचाऱ्यांवरील ताण वाढेल. कृषी सहायकांनी या प्रयोगांवर बहिष्कार टाकलेला आहे. त्यामुळे विमा कंपन्यांचे फावेल आणि शेतकऱ्यांचे हाल होतील, असा मुद्दा डॉ. बोंडे यांनी मांडला.   कृषी सहायकांनी महाडीबीटी, पोकरा अभियानाच्या कामांवर देखील बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे योजनांपासून शेतकरी वंचित आहेत. पंतप्रधान किसान कल्याण निधीची जबाबदारी महसूल विभागाने कृषी विभागावर ढकलली आहे. कृषी अधिकारी ही जबाबदारी स्वीकारण्यास तयार नाहीत. या घोळातून केंद्राची चांगली योजना शेतकऱ्यांपर्यंत पोचण्यास अडथळा आलेला आहे. त्यामुळे दोन विभागातील मतभेद मिटवावा. तसेच रिक्त पदे भरावीत, पोकरा, आत्मा व स्मार्ट योजना पूर्ण क्षमतेने राबवावे अशाही मागण्यांचे निवेदन कृषी आयुक्तांना देण्यात आले. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Election Commission: 'तृणमूल काँग्रेस'चं नाव, चिन्ह गोठवलं; ममतांच्या पक्षाला ‘फुटबॉलपटू’ चिन्ह; निवडणूक आयोगाचा निर्णय

Ahilyanagar District Bank : अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी ३,८३६ मतदार

Farmers Protest : पीक पंचनामा मुद्द्यावर सटाण्यात तहसीलदारांना घेराव

Mohapada Encroachment : मोहपाडा अतिक्रमणप्रश्नी उपग्रह प्रतिमांचा आधार

Dried Sugarcane Crops : करपलेल्या उसात जनावरे सोडण्याची वेळ

SCROLL FOR NEXT