कामगंध सापळा
कामगंध सापळा 
मुख्य बातम्या

नगरमध्ये कामगंध सापळे मिळेनात

टीम अॅग्रोवन

नगर ः जिल्ह्यामध्ये यंदा जनजागृती करूनही कापसावर बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. बोंड अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कामगंध सापळे वापरावेत असे अवाहन केले जात आहे. मात्र खते, बियाणे विक्री करणाऱ्या बहुतांश दुकानात कामगंध सापळे उपलब्ध नाहीत. त्यामुळे कामबंद सापळे नेमके मिळतात कोठे? याचीच शेतकऱ्यांना माहिती मिळत नाही. काही दुकानात सापळे उपलब्ध होते, मात्र तेथेही आता टंचाई असल्याचे दिसत आहे. नगर जिल्ह्यामध्ये गतवर्षी कापसावर बोंड आळीचा प्रादुर्भाव झाल्याने मोठा आर्थिक फटका बसल्यामुळे यंदा हा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी शासन स्तरावर अगदी सुरवातीपासूनच प्रयत्न सुरू होते. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनाही सातत्याने "बोंड अळीबाबत जागृती करा, प्रभावी उपाययोजना करा; पण बोंड अळीचा प्रादुर्भाव रोखा,'' असे सातत्याने अवाहन केले होते. मात्र, तरीही नगर जिल्ह्यामधील राहुरी, नेवासा, पाथर्डी, शेवगाव भागात कापसावर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव आढळून आल्याने शेतकरी धस्तावले आहेत. ज्या भागात बोंड अळी आढळून आली, त्या ठिकाणी कृषी अधिकारी भेटी देत आहेत. मात्र, बोंड अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कामगंध सापळे वापरावेत, असे कृषी विभाग सातत्याने अवाहन करत आहे. मात्र, ते सापळे नमके भेटतात कुठे? याची बहुतांश शेतकऱ्यांना माहिती नाही. बाजारातही बहुतांश दुकानात ते उपलब्ध नाहीत. मध्यंतरी नगरमध्ये काही दुकानात प्रती पन्नास रुपयाला एक सापळा मिळत होता. आता तेथेही टंचाई आहे. सापळे लावायचे कसे ? बोंड अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कामगंध सापळे वापरण्याचे सुरवातीपासून सांगितले जात आहे. मात्र, ते लावायचे कसे याची अजूनही अनेक शेतकऱ्यांना माहिती नाही. गतवर्षीप्रमाणे यंदाही बोंड अळीचा प्रादुर्भात दिसून येत असताना कापूस लागवड केलेल्या पाच टक्के शेतकऱ्यांनीही कामगंध सापळे लावले नसल्याचे नगर जिल्ह्यामधील चित्र आहे. प्रतिक्रिया कृषी विभागाने प्रात्यक्षिकांतर्गत लागवड केलेल्या ठिकाणी शासनाने सापळे उपलब्ध करून दिले. शेतकऱ्यांसाठी कृषी दुकानदारांकडे कामगंध सापळे उपलब्ध करून दिले आहे. शिवाय ना नफा ना तोटा या तत्त्वावर विक्री सुरू आहे. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत सुमारे दीड लाख कामगंध सापळ्याची विक्री झालेली आहे. सापळे कसे लावायचे यांसह अन्य माहितीबाबत कृषी विभागाकडून जनजागृती केली जात आहे. - पंडीत लोणारे,  जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नगर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rice Research : अधिक ‘बी१’ जीवनसत्त्व असलेला भात विकसित

Waghad Project : ‘वाघाड’ने घडविला कायापालट

Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

Road Work Update : पाणंद रस्त्यांची ८५० हून अधिक कामे ठप्प

Mathadi Worker Protest : माथाडी कामगारांचे सरणावर बसून आंदोलन

SCROLL FOR NEXT