‘एसएओ’च्या बदल्या रखडल्या
‘एसएओ’च्या बदल्या रखडल्या 
मुख्य बातम्या

‘एसएओ’च्या बदल्या रखडल्या

टीम अॅग्रोवन

पुणे: राज्यातील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी (एसएओ) पदाच्या बदल्यांमध्ये आता एका राजकीय नेत्याने रस घेतल्यामुळे मुख्यमंत्री कार्यालयात गेलेली फाईल पुन्हा बोलावण्यात आल्याचे सांगण्यात आले. ‘एसएओं’च्या बदल्यांच्या यादीमध्येच राज्याच्या मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारीपदाचा देखील समावेश आहे. याच पदासाठी सर्वात जास्त लॉबिंग सुरू असल्याने बदल्या रखडल्याची माहिती सूत्रांनी दिली.  राज्यात खते, कीटकनाशके, बियाण्यांच्या उद्योगांची उलाढाल ३० हजार कोटींची आहे. या उद्योगाला नियंत्रित करणारे पद म्हणून मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारीपदाचा उल्लेख केला जातो. या पदावरील आधीचे ‘एसएओ’ सुभाष काटकर यांच्या कालावधीत गुणनियंत्रण विभागातील मोठा घोटाळा उघड झाला. त्यामुळे त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले. त्यांना रजेवर पाठविताच कृषी खात्यातील सोनेरी टोळीकडून गुणनियंत्रण विभागात आपला अधिकारी घुसविण्यासाठी लॉबिंग सुरू केले, असे कर्मचारी सांगतात.  राज्यात दुष्काळ, पीकविमा, रखडलेल्या पेरण्यांचा मुद्दा गाजत असला, तरी कृषी विभागात सुरू असलेल्या बदल्यांच्या घोळामुळे उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे. बदलीस पात्र नसलेले व बदलीच्या प्रक्रियेत नसलेले अधिकारीदेखील आता सोयीप्रमाणे पदे मागत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.  बदल्यांची फाईल कोणाच्या ताब्यात? ‘एसएओं’च्या बदल्याबाबत राज्याच्या नागरी सेवा मंडळाने दोन महिन्यापूर्वीच आपला अहवाल सादर केला होता. अहवालातील शिफारशींवर आधारित तयार झालेल्या बदल्यांच्या फाईलवर तत्कालीन कृषिमंत्र्यांनी स्वाक्षरी देखील केली होती. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या अंतिम मान्यतेसाठी प्रकरण गेल्यावर कृषी मंत्रालयाने अवलोकनासाठी फाइल पुन्हा मागविली होती. परंतु, सध्या बदल्यांची फाईल कोणाच्या ताब्यात, कशासाठी पडून आहे याची माहिती कोणालाही नाही, असे सूत्रांनी स्पष्ट केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT