संत एकनाथ महाराज समाधी दर्शनासाठी भाविकांची गर्दी
संत एकनाथ महाराज समाधी दर्शनासाठी भाविकांची गर्दी 
मुख्य बातम्या

संत एकनाथ महाराज समाधी दर्शनासाठी भाविकांची गर्दी

टीम अॅग्रोवन

पैठण, जि. औरंगाबाद : पैठण येथील शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराज यांच्या ४२० व्या नाथषष्ठीनिमित्ताने राज्यातील चारशे ते पाचशे दिंड्यांच्या माध्यमातून आलेल्या भाविकांनी मंगळवारी (ता.२६) श्री संत एकनाथ महाराज समाधीचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली. मंगळवारी सकाळी ११.१५ वाजता षष्ठीची नाथवंशजाची निर्याण दिंडी गावातील नाथ मंदिरातून काढण्यात आली. या दिंडीत अक्षदा दिलेले सर्व मानकरी सहभागी झाले होते. ही दिंडी वाळवंटातून बाहेरील नाथ मंदिरात नेण्यात आली. या ठिकाणी ‘अवघेचे त्रैलौक्य, आनंदाचे आता’ या अभंगावर वारकऱ्यांनी ठेका धरला होता. नाथषष्ठी यात्रेस तुकाराम बीजेच्या मुहूर्तावर सुरवात झाली. मंगळवारी सकाळपासूनच शहरात ‘भानुदास एकनाथ’ या जयघोषात लहान मोठ्या दिंड्या दाखल झाल्या असून, मंगळवार (ता.२६) ते गुरुवार (ता.२८) या तीन दिवसांच्या कालावधीत संत एकनाथ महाराज यांचा नाथषष्ठी महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. त्याअनुषंगाने शासकीय यंत्रणेकडून भाविकांना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. यावर्षी यात्रेत सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. दर्शनासाठी महिला व पुरुषांची दर्शनबारी वेगळी करण्यात आली आहे. भाविकांना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून पैठण नगर परिषदेचे नगराध्यक्ष सुरज लोळगे, मुख्याधिकारी सोमनाथ जाधव आदी प्रयत्न करत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Stamp Duty : सातारा जिल्ह्यात पीककर्जासाठी ‘मुद्रांक शुल्क’ माफ

Onion Market : कांदा दरात घसरणीने उत्पादक अडचणीत

Water Scarcity : लोणी भापकर योजनेमुळे आठ गावे अन् ७८ वाड्या होणार टंचाईमुक्त

Co-operative Society : विकास सेवा सोसायट्यांवर आता ‘सीसीटीव्ही’चा ‘वॉच’

Silver Rate : चांदी दरात १४०० रुपयांची वाढ

SCROLL FOR NEXT