सांगली जिल्हा परिषदेत  १०९ पदे रिक्त; प्रशासनावर ताण In Sangli Zilla Parishad 109 vacancies; Stress on administration
सांगली जिल्हा परिषदेत  १०९ पदे रिक्त; प्रशासनावर ताण In Sangli Zilla Parishad 109 vacancies; Stress on administration 
मुख्य बातम्या

सांगली जिल्हा परिषदेत १०९ पदे रिक्त; प्रशासनावर ताण 

टीम अॅग्रोवन

सांगली : जिल्हा परिषदेच्या विविध विभागांतील तब्बल १०९ पदे रिक्त आहेत. हे प्रमाण मंजूर पदांच्या ३३ टक्के इतके गंभीर आहे. या पदांवर भरती किंवा नवीन अधिकाऱ्यांची बदली होण्याची प्रक्रिया खोळंबली आहे. त्यामुळे विकास कामांची गतीही रोडावली आहे. पशुसंवर्धन आणि शिक्षण विभागाची मोठी अडचण झाली आहे.

जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना पत्रव्यवहार केला आहे, मात्र शासनाकडून अद्याप फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. पालकमंत्री जयंत पाटील यांनी या विषयात लक्ष घालण्याची ग्वाही दिली आहे. 

जिल्हा परिषदेच्या वित्त आणि लेखा विभागाचा अपवाद वगळता अन्य सर्व विभागांमध्ये रिक्त जागांची समस्या आहे. शिक्षण विभागाने आता मॉडेल स्कूलचा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला आहे. परंतु, जिल्हा शिक्षणाधिकारी हे महत्त्वाचे पदच रिक्त आहे. त्या शिवाय, एकूण सतरा पदे रिक्त आहेत. त्यात शिक्षकांच्या पदांचा समावेश नाही. ही प्रशासकीय पदे आहेत. पालकमंत्री जयंत पाटील यांनी त्याची गंभीर दखल घेतली आहे. हा विषय येत्या काही दिवसांत मार्गी लावला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. 

पशुसंवर्धन हा जिल्ह्यातील महत्त्वाचा शेती पूरक व्यवसाय आहे. त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहेत. तब्बल ५१ पदे रिक्त आहेत. ही पदे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची आहेत. त्यामुळे उपलब्ध डॉक्‍टरांवर प्रचंड ताण आहे. या सर्व परिस्थितीत पद भरतीसाठी ग्रामविकास विभागाकडे ताकदीने पाठपुरावा सुरू आहे. त्यात किती यश येते, याकडे लक्ष असेल. 

विभागनिहाय रिक्त पदे अशी 

  • बांधकाम विभाग : ४ 
  • जलसंधारण : ७ 
  • पाणीपुरवठा : ६ 
  • आरोग्य : १४ 
  • पशुसंवर्धन : ५१ 
  • कृषी : २ 
  • शिक्षण : १७ 
  • समाजकल्याण : १ 
  • बाल विकास : ७ 
  • प्रतिक्रिया जिल्हा परिषदेच्या कामकाजात रिक्त पदांची अडचण मोठी आहे. कामे गतीने मार्गी लागत नाहीत आणि एखादा नवा उपक्रम हाती घ्यायचा तर मनुष्यबळाची अडचण होते. त्या बाबत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे.  - प्राजक्ता कोरे, अध्यक्षा, जिल्हा परिषद 

    जिल्हा परिषद अध्यक्षांना मी मंत्रालयात बोलावले आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या सोबत एक बैठक घेऊन हा विषय मार्गी लावला जाईल. मी या विषयात लक्ष घातले आहे.  -जयंत पाटील, पालकमंत्री, सांगली.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

    MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

    Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

    Kharif Sowing : साडेसात लाख हेक्टरवर जिल्ह्यात खरिपाचा पेरा

    Shaktipeeth mahamarg : 'रस्त्यांवरच्या लढाईची शेतकऱ्यांनी तयारी करावी', शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची एकजूठ

    SCROLL FOR NEXT