शेतकरी संसदेला धडक देणार; संयुक्त किसान मोर्चाचा सरकारला इशारा 
शेतकरी संसदेला धडक देणार; संयुक्त किसान मोर्चाचा सरकारला इशारा  
मुख्य बातम्या

शेतकरी संसदेला धडक देणार; संयुक्त किसान मोर्चाचा सरकारला इशारा 

सकाळ न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करणाऱ्या करणाऱ्या शेतकऱ्यांनी पुढील दोन महिन्यांसाठीचा लढ्याचा आराखडा बुधवारी (ता.३१) जाहीर केला आहे. मे महिन्यात भर उन्हामध्ये पायी चालत संसद भवनाच्या दिशेने कूच करण्याचा निर्धार संयुक्त किसान मोर्चाच्या नेत्यांनी बोलून दाखविला. 

मोर्चाच्या नेत्यांमध्ये कालच खलबते झाली होती. या बैठकीमध्येच संसद भवनाला धडक देण्याचा निर्धार करण्यात आला. या आंदोलनाची तारीख मात्र अद्याप निश्‍चित करण्यात आलेली नाही. शेतकरी नेते गुरुनामसिंग चढुनी म्हणाले की, या मोर्चामध्ये केवळ शेतकरीच नाही तर महिला आणि बेरोजगार तरुण देखील सहभागी होणार आहेत. हे आंदोलन पूर्णपणे शांततेत होईल. 

२६ जानेवारीच्या दिवशी जो प्रसंग घडला होता तो पुन्हा होऊ नये म्हणून विशेष काळजी घेण्यात येईल असेही त्यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये बोलताना सांगितले. या मोर्चादरम्यान पोलिसांनी कारवाई केली तर जमाव बिथरू नये म्हणून वेगळी समिती स्थापन करण्याचा मुद्दाही काही शेतकरी नेत्यांनी या बैठकीमध्ये मांडला होता. 

वाहतूक रोखून धरणार  आता दहा एप्रिल रोजी या शेतकरी संघटना चोवीस तासांसाठी कुंडली- मानेसर- पलवाल या एक्स्प्रेस वेवरील वाहतूक रोखून धरणार आहेत. सकाळी अकराच्या सुमारास हे आंदोलन सुरू होईल ते दुसऱ्या दिवशी अकरापर्यंत चालेल. सरकार आमच्या मागण्या मान्य करत नसल्याने आम्ही हे पाऊल उचलत आहोत, असे शेतकरी नेत्यांनी सांगितले. या आंदोलनामध्ये हुतात्मा झालेल्या शेतकऱ्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी ६ मे रोजी विशेष कार्यक्रमाचेही आयोजन केले जाणार आहे.  असे असतील कार्यक्रम...

  • ५ एप्रिल : भारतीय अन्न महामंडळ (एफसीआय) बचाव दिवस, एफसीआय कार्यालयांना घेराव
  • १० एप्रिल : कुंडली- मानेसर- पलवाल ( केएमपी) एक्स्प्रेस मार्ग २४ तासांसाठी बंद करणार
  • १३ एप्रिल : बैसाखी सण दिल्लीच्या सर्व सीमांवर साजरा करणार
  • १४ एप्रिल :  डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त संविधान बचाव दिन साजरा करणार
  • १ मे : दिल्लीच्या सर्व सीमांवर मजदूर दिन साजरा करणार. शेतकरी-कामगार एकतेअनुषंगीक विविध कार्यक्रमांचे आयोजन
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Tur Market : दरात तेजीच्या अपेक्षेने तूर उत्पादकांनी विक्री रोखली

    Weather Update : कोकणात उष्ण, दमट हवामानाचा येलो अलर्ट

    Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

    APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

    Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

    SCROLL FOR NEXT