Road Stop at Parbhani, Hingoli and Nanded districts
Road Stop at Parbhani, Hingoli and Nanded districts 
मुख्य बातम्या

परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांत ठिकठिकाणी रास्ता रोको

टीम ॲग्रोवन

परभणी : शेतकऱ्यांना विनाअट संपूर्ण कर्जमुक्ती देण्यासह अन्य मागण्यांसाठी बुधवारी (ता. ८) परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांतील अनेक भागांत ग्रामीण भारत बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काम करणाऱ्या विविध पक्ष, संघटनांतर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

आंदोलनांत विविध मजूर, कामगार संघटना सहभागी झाल्यामुळे परभणी कृषी उत्पन्न बाजार समितील शेतीमालाच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार बंद राहिले. शेतीमालाची आवक कमी होती. महसूल, कृषी, आदी विभागातील कर्मचाऱ्यांच्या संपामुळे विविध शासकीय कार्यालयातील कामकाज ठप्प झाले.

शेतकरी संघर्ष समन्वय समितीचे निमंत्रक कॉम्रेड विलास बाबर यांच्या नेतृत्वाखाली परभणी -गंगाखेड रस्त्यावर पोखर्णी फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करून बंद पाळण्यात आला. तहसीलदार विद्याचरण कडवकर यांना निवेदन देण्यात आले.

सेलू येथे किसान सभेचे रामेश्वर पौळ यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले. नांदेड जिल्ह्यातील अनेक भागांत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हिंगोली जिल्ह्यात डोंगरकडा, सेनगाव आदी भागांत बंदला प्रतिसाद मिळाल्याचे स्वाभिमानीचे  जिल्हाध्यक्ष रावसाहेब अडकिने म्हणाले. 

स्वाभिमानी उतरली रस्त्यावर

प्रादेशिक आर्थिक भागीदारीचा करार केंद्र सरकारने स्वीकारू नये, शेतकऱ्यांना विनाअट संपूर्ण कर्जमुक्ती, खरीप पीकविमा परतावा देण्यात यावा, आदी मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे यांच्या नेतृत्वाखाली परभणी जिल्ह्यात परभणी-गंगाखेड रस्त्यासह अन्य ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage : एप्रिलमध्ये पिकांचे २७ कोटींचे नुकसान

Agriculture Irrigation : आक्रोश मोर्चाचे रूपांतर उपोषणात

Cotton Cultivation : सरासरीच्या तुलनेत यंदा कपाशीची लागवड वाढणार

Book Review : ऋग्वेदाच्या पौराणिक अन् वैज्ञानिक स्पष्टीकरणाचा प्रयत्न

Drought Monitoring : दुष्काळ पाहणी पथकांचा सोपस्कार

SCROLL FOR NEXT