राज्याच्या तापमानात वाढ
राज्याच्या तापमानात वाढ  
मुख्य बातम्या

राज्याच्या तापमानात वाढ

टीम अॅग्रोवन

पुणे : पावसाने उघडीप दिल्यानंतर राज्याच्या तापमानात चढ उतार होत आहे. राज्यात विदर्भ, कोकणात कमाल तापमानात सरासरीपेक्षा दोन अंशांची वाढ झाली आहे. मंगळवारी (ता. ३१) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाने हजेरी लावली, तर मराठवाड्यासह राज्याच्या बहुतांशी भागात मुख्यत: कोरडे हवामान होते. शनिवारपर्यंत (ता.४) कोकणात काही ठिकाणी, तर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.  राज्यात दिवसाच्या कमाल तापमानाचा पारा ३० अंशांच्या पुढे गेला आहे, तर रात्रीचे तापमानही २२ ते २७ अंशाच्या जवळपास आहे. विदर्भ, मराठवाडा आणि कोकणात तापमानात वाढ होण्याबरोबरच ढगाळ हवामान असल्याने उकाडाही वाढला आहे. चंद्रपूर येथे राज्यातील सर्वाधिक ३३.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रात बहुतांशी ठिकाणी तापमान सरासरीच्या आसपास आहे. विदर्भातील अकोला, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, नागपूर, वर्धा येथे ३३ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली आहे.    मध्य उत्तर प्रदेश आणि परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र सक्रीय असून, या भागात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ईशान्य भारतातील राज्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. दक्षिण भारतात किनाऱ्यालगत समुद्र खवळणार असून, मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. तर महाराष्ट्रात पावसाची उघडीप राहणार असली तरी शुक्रवारपासून (ता.३) कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.   मंगळवारी (ता.३१) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे २८.९, नगर ३१.५, कोल्हापूर २६.४, महाबळेश्वर १९.३, मालेगाव ३१.०, नाशिक २८.४, सांगली २८.०, सातारा २६.६, सोलापूर ३२.३, मुंबई २९.५, अलिबाग ३०.१, रत्नागिरी २९.५, डहाणू ३२.१, आैरंगाबाद २९.४, परभणी ३२.७, नांदेड ३२.५, अकोला ३३.१, अमरावती ३१.४, बुलडाणा ३०.७, ब्रह्मपुरी ३३.२, चंद्रपूर ३३.६, गोंदिया ३१.०, नागपूर ३३.३, वर्धा ३३.२, यवतमाळ ३०.५.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Rain : वादळी पावसाने टोमॅटो, मिरची, भेंडीसह ऊस पीक उद्धवस्त, नुकसान भरपाई मिळणार कधी?

Konkan Ranmeva : कोकणच्या रानमेव्यावर वातावरणाचा परिणाम, अनेकांचे आर्थिक गणित कोलमडणार

Agrowon Podcast : हळदीचे भाव तेजीतच; कापूस, सोयाबीन, गहू, लिंबू यांचे काय आहेत दर पाहुयात?

Ethanol Production : कांदा उत्पादकांच्या पाठोपाठ ऊस उत्पादकांनाही सरकारनं घोषणा करून भूलवलं ? | शेतीच्या बातम्या

Maharashtra Rain : राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा; देशातील अनेक भागात तापमानाचा पारा ४२ ते ४६ अंशाच्या दरम्यान

SCROLL FOR NEXT