अकोला ः येथे अायोजित पत्रकार परिषदेत उपस्थित जलसंधारण मंत्री राम शिंदे, कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर, पालकमंत्री रणजित पाटील अादी.
अकोला ः येथे अायोजित पत्रकार परिषदेत उपस्थित जलसंधारण मंत्री राम शिंदे, कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर, पालकमंत्री रणजित पाटील अादी. 
मुख्य बातम्या

ठेकेदारांवर कारवाईचे जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार : राम शिंदे

टीम अॅग्रोवन

अकाेला  ः जलयुक्त शिवारअंतर्गत विविध कामांत नियमितता करणाऱ्या ठेकेदारांविरुद्ध अाता कारवाई करण्याचे अधिकार जिल्हास्तरावर थेट जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात अाले अाहेत. याबाबत शासनाने धोरण ठरविले असल्याची माहिती जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी बुधवारी (ता. ८) सायंकाळी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेत जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, राज्याचे कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर, मृद् व जलसंधारण विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, विभागीय अायुक्त पीयूष सिंह व पाचही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी उपस्थित हाेते.

या निर्णयामुळे जलयुक्तच्या कामातील दिरंगाई करणाऱ्यांवर वचक निर्माण होईल. जिल्हाधिकारी संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकणे, त्याच्याविरुद्ध फाैजदारी दाखल करण्याचे अधिकार दिल्याचे सांगत शिंदे पुढे म्हणाले, ‘जलयुक्त’च्या कामात अनियमितता हाेऊ नये यासाठी तालुका, उपविभाग, जिल्हा, विभागीय स्तरावर समित्या स्थापन केल्या अाहेत.

मुख्य सचिवांच्या स्तरावरसुद्धा समिती स्थापन करण्यात आली. समित्यांना ‘जलयुक्त’च्या काेणत्याही कामात दाेष, त्रृटी, अनियमितता आढळल्यास संबंधित ठेकेदारावर कारवाई करता येईल. यासंदर्भात उच्च न्यायालयातदेखील जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे शासनाने माजी न्यायाधीश जॉनी जाेसेफ यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. ही समिती काही प्रकरणांचा अभ्यास करून अहवाल सादर करणार आहे.

जलयुक्तच्या कामात पुढाकार घेणाऱ्या गावांना, तालुक्यांना, जिल्ह्यांना तसेच पत्रकारांना रोख रकमेचे पुरस्कार दिले जात अाहेत. अकोला येथे झालेल्या सोहळ्यात एक काेटी १० लाख ३४ हजार रुपयांचे ६९ पुरस्कार वाटप केल्याची माहिती शिंदे यांनी दिली.

बाजारभाव-हमीभाव यातील तफावत देण्याचा विचार शेतीमालाचे भाव पडल्याचा मुद्दा कृषिमंत्री फुंडकर यांना विचारला असता त्यांनी शेतीमालाचे बाजारातील भाव व हमीभाव यातील तफावत शेतकऱ्याला देण्याबाबत विचार सुरू असल्याचे सांगितले. जर खुल्या बाजारात शेतीमाल हमीभावापेक्षाही कमी दराने विकल्या जात असेल तर तो शासन खरेदी करेल. यासाठी हमीभाव खरेदी केंद्र उघडण्यात अाली अाहेत. कीडनाशकाच्या विषबाधेतून अकाेला जिल्ह्यात आठ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला, असे असताना सुद्धा एकाही कीटकनाशक विक्रेत्यावर फाैजदारी दाखल करण्यात आली नाही, असे विचारले असता कीटनाशक बळीप्रकरणी एसआयटीच्या अहवालावर कारवाई करण्यात येईल. तर हरभरा बियाणे घोळप्रकरणी काय कारवाई केली याचा अहवाल दोन दिवसांत घेत असल्याचे सांगतिले. या वेळी नोटाबंदीचे समर्थन करीत राम शिंदे, पांडुरंग फुंडकर या दोघांनीही विरोधकांवर टीका केली. मुद्दाच नसल्याने ते अशी अांदोलने करीत असल्याचे ते म्हणाले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT