paddy purchased
paddy purchased  
मुख्य बातम्या

धान खरेदी प्रभावित होण्याची शक्यता

टीम अॅग्रोवन

भंडारा : खरीप हंगामातील धान केंद्र सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. मात्र सिहोरा परिसरातील गोदामातून गेल्या हंगामातील धानाची उचल करण्यात आली नाही. परिणामी धान खरेदी प्रभावित करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सिहोरा परिसरात गेल्या हंगामात धान्याचे विक्रमी उत्पादन झाले होते. उत्पादित धानाची विक्री हमीभावाने शासनाला करण्यात आली. ग्रामपंचायतीच्या ताब्यात असणारे सभामंडप धान्याचे गोदाम म्हणून उपयोगात आणले गेले. मात्र सभामंडपात ठेवण्यात आलेल्या या धानाला पुराच्या पाण्याचा फटका बसला पुराच्या पाण्यामुळे धान ओले झाले. नुकसान टाळण्याकरिता गोदामातील धानाची उचल करण्यात आली. यासर्व उपाययोजना नदीकाठावरील गोदामाच्या बाबतीत करण्यात आल्या. सुरक्षित ठिकाणी असलेल्या गोदामातील धान अद्यापही जैसे थे आहे. खरीप हंगामातील हलक्‍या प्रजातीच्या धानाची सुरू झाली आहे. दिवाळी सणासाठी लागणाऱ्या पैशांची सोय करण्याकरिता शेतकरी धान विक्रीची लगबग करतात. शासनाने देखील शासकीय धान्य खरेदी प्रक्रियेला वेग दिला आहे. मात्र सिहोरा गावात असणाऱ्या सहकारी राईस मिलमधील गोदामातून पंधरा हजार पोत्यांची अद्याप सर करण्यात आली नाही. गोदेखारी गावातील पंचवीस हजार होते देखील गोदामातच आहेत. राईस मिल संचालकांकडून नव्या हंगामातील खरेदी करण्यासाठी गोदाम रिकामे  करण्याची मागणी होत आहे. या संदर्भाने पत्रव्यवहार देखील करण्यात आला. परंतु प्रशासनाकडून त्याची अद्याप दखल घेण्यात आली नाही परिणामी धान खरेदी प्रक्रिया प्रभावित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

Agriculture Share : शेती निम्म्या हिश्‍शाने देण्याकडे शेतकऱ्यांचा कल

Orchard Cultivation : ‘मनरेगा’अंतर्गत फळबाग लागवडीत कृषी विभाग अव्वल

Agrowon Sanvad : आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने शेती करावी

SCROLL FOR NEXT