crop damage
crop damage  
मुख्य बातम्या

‘परती’चा तडाखा

टीम अॅग्रोवन

पुणे ः राज्यातील अनेक भागांना शनिवारी (१०) आणि रविवारी (ता.११) परतीच्या पावसाने अक्षरशः झोडपून काढले. कोकणात शेतात काढून ठेवलेले भात पीक पाण्यावर तरंगत होते, तर, मराठवाड्यात वेचणीला आलेला कापूस पाण्यात भिजला आणि गळून पडला. राज्यभरात सोयाबीन, तूर, कांदा, टोमॅटो, ऊस, मका आणि फळबागांचे मोठे नुकसान झाले. सप्टेंबर महिन्यात पावसाच्या कहरातून वाचलेली पिके आता नुकसानीच्या कचाट्यात सापडली आहेत.

कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील अनेक भागात कमी अधिक प्रमाणात परतीच्या पावसाने हजेरी लावली. तर दक्षिण रायगडमधील महाड, पोलादपूरला, माणगाव, म्हसळा या तालुक्यात विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. अनेक भागांत वीज पुरवठाही खंडीत झाला होता. शेतात कापणी करून ठेवलेला भात शेतात पाणी साचल्याने भिजला. अनेक ठिकाणी पीक पाण्यावर तरंगत होते.

मध्य महाराष्ट्रात जोरदार मध्य महाराष्ट्रातील नगर, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यांतील अनेक भागांत जोरदार पाऊस पडला. शेतीचे मोठे नुकसान झाले. नुकतीच लागवड केलेल्या कांदा, टोमॅटो यासारखी पिके धोक्यात आली. शेतात पाणी साचून कांदा रोप शेतातच सडू लागले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी दुपार नंतर बहुतांशी भागास पावसाने झोडपले. रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरू होता. सोयाबीन व भात कापणी करणाऱ्या शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. खरीप पिकाबरोबरच उसाचेही नुकसान झाले. पावसामुळे भात, ऊस, भुईमुगाचे मोठे नुकसान झाले.  

विदर्भात सर्वदूर हलका पाऊस विदर्भातील जवळपास सर्वच जिल्ह्यांत सर्वदूर पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी पडल्या. रविवारी वाशीम, बुलडाणा जिल्ह्यात काही भागांत जोरदार पाऊस झाला. अनेक शेतकऱ्यांची सोंगलेली सोयाबीन भिजले तर काहींच्या गंजीमध्ये पाणी जाऊन नुकसान झाले. सोयाबीन, बाजरी पिकांच्या काढणी-मळणीत आले असताना पावसाने व्यत्यय येत असून मोठे नुकसान होत आहे.

रविवारी (ता.११) सकाळी आठ वाजेपर्यंत झालेला पाऊस, मिलिमीटर ः स्त्रोतः हवामान विभाग  कोकण : महाड ६७, माथेरान ३४.४, पनवेल ५५.४, पोलादपूर ५४, सुधागडपाली ३२, रत्नागिरी ५२.९, देवगड ९९, वैभववाडी ५६. मध्य महाराष्ट्र : कर्जत ९८, श्रीगोंदा ३०, गडहिंग्लज ५३, पन्हाळा ८५, बारामती ४६.८, भोर ३९.७, दौंड ५४, इंदापूर ३२.२, पुरंदर ४३.७, आटपाडी ३२, कडेगाव ३८, मिरज ३५, विटा ३२, वाळवा ४०, खंडाळा ८१, कोरेगाव ५५, करमाळा ३६, माळशिरस ३५, सांगोला ३४. मराठवाडा : अंबाजोगाई ३८, सेनगाव ६०, मंथा २८, लातूर २६, उस्मानाबाद ५९, सोनपेठ ३५. विदर्भ : जेवती ३५.२, सिरोंचा २९.३, आर्वी २३.२, खारंघा २५.३, उमरखेड १८.६

मराठवाड्यात कापूस, सोयाबीनचे नुकसान मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, उस्माबानादमध्ये दुपारी विजेच्या गडगडाटासह जोरदार पाऊस सुरू झाला. पावसामुळे वेचणीस आलेल्या कापसाच्या वाती होतील अशी चिन्हे आहेत. दावरवाडी (ता. पैठण) परिसरात विजेच्या कडकडासह जोरदार पाऊस सुरू होता. ढोरकीन येथे जोरदार पाऊस सुरू होता. जालना जिल्ह्यातील वाटुरला विजांचा कडकडाट  व वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. परतूर, शहागडसह परिसरात पाऊस सुरु होता. परभणी, हिंगोली जिल्ह्यातील १४ तालुक्यात हलका ते जोरदार पाऊस झाला. कापणी केलेले सोयाबीन, फुटलेली कपाशीचे भिजून नुकसान झाले.

पावसाने केली दाणादाण

  •    पावसामुळे कापूस गळून पडला
  •    सोंगूण ठेवलेले सोयाबीन भिजले
  •    कापणी केलेला भात पाण्यावर तरंगला
  •    टोमॅटो, दोडक्याच्या वेली जमीनदोस्त
  •    वादळामुळे ऊस, मका पीक आडवे
  •    पाणी साचून कांदा रोपे सडू लागली
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Animal Care : वाढत्या उष्णतेचा पशुधनास फटका

    Public Well Policy : सार्वजनिक विहिरींच्या पुनरुज्जीवनावर धोरण काय?

    Agriculture Irrigation : ‘म्हैसाळ’चे पाणी माडग्याळ शिवारात

    Jalgaon Lok Sabha : ...तर जळगावचे चार खासदार पोहोचतील लोकसभेत

    Banana Orchard Burn : सातपुड्याच्या पायथ्याशी केळी बागा करपल्या

    SCROLL FOR NEXT