राजकुमार बडोले
राजकुमार बडोले 
मुख्य बातम्या

धानाचे प्रलंबित गोदाम भाडे द्या : बडोले

मारुती कंदले

मुंबई ः आधारभूत हमीभाव धान खरेदी योजनेंतर्गत खरेदी केलेल्या धानाच्या साठवणुकीसाठी भाड्याने घेतलेल्या खासगी गोदामांचे २००९ पासून प्रलंबित असलेले गोदाम भाडे तातडीने देण्यात यावे, असे आदेश सामाजिक न्याय आणि विशेष साहाय्यमंत्री राजकुमार बडोले यांनी दिले. विदर्भातील धान उत्पादक पाच जिल्ह्यांतील धान खरेदी करणाऱ्या सहकारी संस्थांच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बडोले यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक पार पडली होती. यासंदर्भात माहिती देताना श्री. बडोले म्हणाले, की आधारभूत हमीभाव धान खरेदी योजनेंतर्गत खरेदी केलेल्या धानाची साठवणूक करण्यासाठी भाड्याने घेतलेल्या खासगी गोदामांचे २००९ ते २०१६ पर्यंतचे भाडे गोदाम मालकांना मिळाले नव्हते. त्यामुळे त्यांनी पुढील हंगामात गोदाम भाड्याने देण्यास नकारात्मक भूमिका घेतली होती. गोदाम मालकांना तातडीने प्रलंबित गोदाम भाडे देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या सहकारी संस्थांनी केलेल्या मुख्य मागण्यांपैकी २०१२ ते २०१५ या कालावधीतील धान साठवणुकीतील तूटही माफ करण्यात आली असून मिलर्सना दंडनीय रकमेत देण्यात आलेल्या सवलतीप्रमाणे या खरेदी संस्थांनाही दंडातून वगळण्यात आले आहे, त्यामुळे धान खरेदी करणाऱ्या सहकारी संस्थांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे श्री. बडोले यांनी सांगितले. महाराष्ट्र स्टेट को-ऑप. मार्केटिंग फेडरेशन लिमिटेडची सब एजंट म्हणून या सहकारी संस्थांनी खरेदी केलेला धान साठा शासकीय यंत्रणेने ४०-४५ महिने उशिराने उचलल्यामुळे घट येत होती. मात्र त्याची वसूली खरेदी संस्थांच्या कमिशनमधून करण्यात येत होती. त्यामुळे धान खरेदी सहकारी संस्थांवर होणारा अन्याय दूर करण्यासाठी धानसाठ्याची तूटही माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला, असे श्री. बडोले म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Care : वाढत्या तापमानात जनावरांचे व्यवस्थापन

Lok Sabha Elections : चुरशीने मतदान; सकाळी ९ पर्यंत कोल्हापूर ८.०४ टक्के तर हातकणंगले ७.५५ टक्के मतदानाची नोंद

Fish Farming : पुनर्वसनग्रस्ताला मिळाला मत्सशेतीतून मोठा आधार

Turmeric Farming : हळदीची वाढली उत्पादकता

Farmer As Life Partner : आदर्शवत विवाहसोहळा

SCROLL FOR NEXT