जळगाव जिल्ह्यात हमीभाव खरेदी केंद्रांत उडदाची नोंदणी अल्पच
जळगाव जिल्ह्यात हमीभाव खरेदी केंद्रांत उडदाची नोंदणी अल्पच 
मुख्य बातम्या

जळगाव जिल्ह्यात हमीभाव खरेदी केंद्रांत उडदाची नोंदणी अल्पच

टीम अॅग्रोवन

जळगाव  ः जिल्ह्यात शासकीय हमीभाव कडधान्य व सोयाबीन खरेदी केंद्रात उडीद विक्रीसंबंधी शेतकऱ्यांकडून हवा तसा प्रतिसाद अजूनही मिळालेला नाही. तर सोयाबीन विक्रीबाबतही फारसा प्रतिसाद मिळालेला नसल्याची माहिती आहे.  सोयाबीनची खरेदी ३७००, मुगाची ७०५० आणि उडदाची ५७०० रुपये प्रतिक्विंटल या दरात हमीभावात खरेदी केली जाणार आहे. जिल्ह्यात अंमळनेर, पाचोरा व जळगाव येथील केंद्रात ही खरेदी केली जाईल. खरेदीसंबंधी मार्केटिंग फेडरेशनने केंद्रांची नियुक्ती केली आहे. या केंद्रांमध्ये ही ऑनलाइन नोंदणी शेतकऱ्यांकडून करून घेतली जात आहे. मूग विक्रीसंबंधी ७०० शेतकऱ्यांनी, उडदासंबंधी २०० शेतकऱ्यांनी नोंदणी करून घेतली आहे. तर सोयाबीन विक्रीसंबंधी फारसा प्रतिसाद तिन्ही केंद्रांत मिळालेला नाही. सोयाबीनची पेरणी जळगाव, चोपडा, यावल व पाचोरा भागात झाली होती. सध्या अर्ली सोयाबीनची मळणी सुरू आहे. तर काही शेतकऱ्यांच्या सोयाबीनची मळणी राहिलेली आहे. बाजारातील दर टिकून असल्याने सोयाबीन विक्रीसंबंधी शेतकऱ्यांकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे सांगितले जात आहे. उडदाचे उत्पादन जिल्ह्यात अपवाद वगळता कुठेही चांगले मिळाले नाही. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. परिणामी, उडीद विक्रीसंबंधीदेखील शासकीय खरेदी केंद्रात ऑनलाइन नोंदणीला प्रतिसाद मिळालेला नाही.  नोंदणीसंबंधी प्रतिसाद लक्षात घेता अधिक दिवस प्रतीक्षा न करता खरेदी दिवाळीपूर्वी सुरू करण्याचे नियोजन मार्केटिंग फेडरेशनने केले आहे. या आठवड्यात एक किंवा दोन केंद्रांत खरेदी सुरू होण्याची शक्‍यता आहे. ३१ ऑक्‍टोबरपर्यंत या केंद्रांमध्ये मूग, उडीद व सोयाबीन विक्रीसंबंधी नोंदणी करण्याची मुदत आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Rate : वाढत्या उन्हामुळे साखरेला मागणी, दरातही वाढ

Food Security Scheme : अन्नसुरक्षा योजनेत पुरवल्या अप्रमाणित निविष्ठा

Jowar Market : पंचवीस हजार क्विंटल ज्वारीची कमी दराने विक्री

Heat Wave Maharashtra : उन्हाच्या चटक्याने राज्य होरपळले

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

SCROLL FOR NEXT