मतदानापासून वंचित राहू नये यासाठी नोंदणी मोहीम
मतदानापासून वंचित राहू नये यासाठी नोंदणी मोहीम 
मुख्य बातम्या

मतदानापासून वंचित राहू नये यासाठी नोंदणी मोहीम ः डॉ. म्हैसकर

टीम अॅग्रोवन

पुणे ः आगामी लोकसभा निवडणुकीत एकही मतदार मतदानापासून वंचित राहू नये यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. पुढील दोन दिवस मतदार नोंदणी अभियान राबविण्यात येत असून, जास्तीत जास्त नागरिक आणि १ जानेवारी २०१९ पर्यंत १८ वर्षे पूर्ण झालेल्या नवमतदारांनी नावनोंदणी करावी, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसकर यांनी शुक्रवारी (ता. १) पत्रकार परिषदेमध्ये केले. तर जास्तीत जास्त नवमतदारांच्या नोंदणीसाठी पुणे, सोलापूर आणि कोल्हापूर विद्यापीठांच्या कुलगुरूंशी भेट घेऊन, सर्व महाविद्यालयांद्वारे मोहीम राबविण्यात येणार असल्याचेही त्यांंनी सांगितले. 

पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्‍ह्यांत १० लोकसभा मतदारसंंघांचा समावेश असून, या निवडणुकीत १ कोटी ९३ लाख ९६ हजार ७५५ मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. या मतदार यादीमध्ये आणखी मतदारांची संख्या वाढू शकते. यासाठी २ आणि ३ मार्चमध्ये विशेष मतदार नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे. 

या निवडणुकीसाठी १९ हजार ८४२ मतदान केंद्रे असणार असून, पुढील दोन दिवस सर्व मतदान केंद्रांवर मतदान केंद्र अधिकारी माहिती सांगणार आहेत. तर ग्रामीण भागात मतदान जनजागृतीचे वाचन केले जाणार आहे. सर्व मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी १ लाख ३७ हजार १६ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची गरज भासणार असून, १ लाख ६८ हजार ६३६ अधिकारी, कर्मचारी उपलब्ध आहेत. 

मतदारांना ई-व्हिजिल ॲपद्वारे तक्रार करता येणार यंदाच्या निवडणुकीत माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला जाणार असून, निवडणूक आयोगाने मतदारांसाठी ई व्हिजिल ॲप विकसित केले आहे. या ॲपद्वारे मतदान केंद्रांवर होणाऱ्या गैरप्रकारांची तक्रार सर्वसामान्य मतदारांना करता येणार आहे. तक्रारींची छायाचित्रे, चलतचित्रेदेखील अपलोड करण्याची सोय या ॲपमध्ये करण्यात आली आहे. ही छायाचित्रे गुगल मॅपद्वारे नियंत्रित असणार असून, जुनी आणि बनावट छायाचित्रे अपलोड करता येणार नसल्याने खरी छायाचित्रे अपलोड करणे शक्य होणार आहे. या तक्रारींची दखल घेण्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात येणार असून, अवघ्या १५ मिनिटांत तक्रारींची दखल घेतली जाणार आहे. यामध्ये तक्रारदारांचे नाव गोपनीय ठेवले जाणार असल्याचेही डॉ. म्हैसकर यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Delhi Farmers' protest : भाजपच्या उमेदवारांविरोधात पंजाबमध्ये शेतकऱ्यांचा रोष वाढला; एसकेएमचा विरोध कायम

Lok Sabha Constituency : कोल्हापूर जिल्ह्यातील ३७ लाख ५० हजार मतदारांचा कौल कोणाला? मतदान केंद्रे सज्ज

Fire in Nainital : उत्तराखंडच्या जंगलातील आग पोहचली शेताच्या बांधावर, एका महिलेचा होरपळून मृत्यू

Animal Ear Tagging : ...अन्यथा भरपाई अन् अनुदान नाही

Sunburn Crop : कोवळी रोपे वाचविण्यासाठी शेतकरी सरसावला

SCROLL FOR NEXT