Registration of 3783 farmers for sale of gram
Registration of 3783 farmers for sale of gram 
मुख्य बातम्या

हरभरा विक्रीसाठी ३७८३ शेतकऱ्यांची नोंदणी

टीम अॅग्रोवन

परभणी/हिंगोली : केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत (प्रतिक्विंटल ५१०० रुपये) योजनेअंतर्गत यंदाच्या (२०२०-२१) हंगामात परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील १५ केंद्रांवर हरभरा विक्रीसाठी शुक्रवार (ता. २६) पर्यंत ३ हजार ७८३ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.

गुरुवारी (ता. २५) हरभरा खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. परंतु आजवर खरेदी झालेली नाही, अशी माहिती जिल्हा विपणन अधिकारी के. जे. शेवाळे यांनी दिली. पणन महासंघातर्फे परभणी जिल्ह्यात परभणी, जिंतूर, बोरी, सेलू, पाथरी, सोनपेठ, पूर्णा या सात ठिकाणी केंद्र असून, आजवर सहा केंद्रांवर ६९४ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. हिंगोली जिल्ह्यात हिंगोली, कळमनुरी, जवळा बाजार, वसमत, सेनगाव, साखरा हे सहा खरेदी केंद्रांवर २ हजार ५२ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. परभणी जिल्ह्यात विदर्भ सहकारी पणन महासंघाच्या मानवत येथील केंद्रावर १ हजार ९२५ शेतकऱ्यांनी अर्ज केले. त्यापैकी २५२ शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी झाली तर गंगाखेड केंद्रांवर १ हजार ४२५ अर्ज आले. त्यापैकी ७८५ शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात आली, असे जिल्हा व्यवस्थापक भागवत सोळंके यांनी सांगितले.

नोंदणी ठिकाण, केंद्र चालकांचे संपर्क क्रमांक ः परभणी ः नवा मोंढा, परभणी (माणिक नीलवर्ण ः ९९६००९३७९६), जिंतूर ः सिद्धेश्‍वर विद्यालय, जिंतूर (नंदकुमार महाजन ः ९४०५४७३९९९), बोरी ः बोरी (गणेश नांदेडकर ः ८८०६०२८०८२), सेलू  ः मार्केट यार्ड सेलू (संतोष शिंदे ९८६०२५१३२७), पाथरी ः मार्केट यार्ड पाथरी (अनंत गोलाईत ः९९६०५७००४२), सोनपेठ ः बाजार समिती व्यापार संकुल (श्रीनिवास राठोड ः ९०९६६९९६९७), पूर्णा ः समर्थ मार्केट पूर्णा (संदीप घाटोळ ः ९३५५९३३३४१३)

हिंगोली  ः जुने जिल्हा रुग्णालया समोर, तोफखाना, हिंगोली (अमोल काकडे ः ८७८८४८७५८०), कळमनुरी ः वारंगा फाटा ता. कळमनुरी (महेंद्र माने ः ९७३६४४९३८३), वसमत ः वसमत (सागर इंगोले ः ८३९०९९५२९४), जवळा बाजार ः जवळा बाजार (कृष्णा हरणे ः ९१७५५८६७५८) सेनगाव ः हिंगोली रोड, सेनगाव (संदीप काकडे ः ९८२३२५२७०७), साखरा ः साखरा (उमाशंकर माळोदे  ः ९६५७२६०७४३).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT