मुदत संपूनही कुलसचिव पदाचे काम सुरूच
मुदत संपूनही कुलसचिव पदाचे काम सुरूच 
मुख्य बातम्या

मुदत संपूनही कुलसचिव पदाचे काम सुरूच

टीम अॅग्रोवन

पुणे : महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे वादग्रस्त कुलसचिव सोपान कासार यांच्या नियुक्तीची मुदत संपून पंधरा दिवसांच्या वर कालावधी उलटला, तरी तेच काम पाहत असल्याने त्यांचे काम अधिकृत कसे समजावे, असा प्रश्‍न कर्मचाऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.  बढत्या, बदल्या, प्रतिनियुक्यांमध्ये सतत चर्चेत असलेल्या या विद्यापीठाचे कुलगुरू आणि कुलसचिव अशी दोन्ही पदे वादाच्या भोवऱ्यात अडकली. लाचखोर अधिकाऱ्याला कुलसचिव नेमता येत नाही, अशी भूमिका राज्याच्या कृषी मंत्रालयाने घेतली होती. मात्र, तत्कालिन मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून जबरदस्तीने वादग्रस्त कुलसचिव निवडण्यात आल्याचे कर्मचारी सांगतात. कासार यांच्याविरोधात लाचखोरीचे दोन गुन्हे दाखल झालेले होते. मात्र, त्यांची नियुक्तीबाबत महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषद, कुलगुरू कार्यालय, कृषी मंत्रालयातील उपसचिव यांच्याकडून राज्य शासनाकडे वेळोवेळी गंभीर बाबी निदर्शनास आणून दिल्या गेल्या नाहीत, अशी माहिती एका शास्त्रज्ञाने दिली. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, २६ फेब्रुवारी २०२० रोजी राहुरी विद्यापीठाच्या कुलसचिवाची मुदत संपुष्टात आली आहे. त्यामुळे २७ फेब्रुवारीपासून शासनाने नवा कुलसचिव नियुक्त करणे अपेक्षित होते. मात्र, या गोंधळातच कुलसचिवावर अजून तिसरा गुन्हा झाला आहे. नगर जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांचा जामीन अर्जही फेटाळला आहे. या सर्व घडामोडींकडे शासन दुर्लक्ष करीत असल्याने कर्मचारी नाराज आहेत.  “कुलसचिवांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता असताना विद्यापीठ प्रशासन दुर्लक्ष करते आहे. विशेष म्हणजे तीन गुन्हे दाखल झाल्यानंतरही कुलसचिवांनी कार्यालय सोडलेले नाही. ही बाब गंभीर स्वरूपाची असून विद्यापीठाच्या भोंगळ काराभाराला चालना देणारी ठरली आहे,” अशी माहिती सूत्रांनी दिली. मुदत संपली तरीही... कृषी विद्यापीठ प्रशासनाने श्री. कासार यांची मुदत संपलेली असली, तरी सध्या कुलसचिव म्हणून तेच अधिकृत काम बघत आहेत, असे स्पष्ट केले आहे. “कुलसचिवांच्या निवडीशी विद्यापीठाचा काहीही संबंध नाही. कासार हे महसूल खात्यातील उपजिल्हाधिकारी असून, त्यांनी मंत्रालयात परस्पर अर्ज करून कुलसचिवपदी नियुक्ती करून घेतलेली आहे. त्यांच्या नियुक्तीला मुख्यमंत्री व कृषिमंत्री कार्यालयाची अधिकृत मान्यता आहे. ही मान्यता २६ फेब्रुवारीपर्यंत असली तरी त्यापुढील काळात कासार यांना कामे करण्यास रोखा, असे शासनाने सांगितलेले नाही. त्यामुळे मुदत संपलेली असली तरी कासार कितीही दिवस काम पाहू शकतील,” असे विद्यापीठातील सूत्रांचे म्हणणे आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Care : वाढत्या तापमानात जनावरांचे व्यवस्थापन

Lok Sabha Elections : चुरशीने मतदान; सकाळी ९ पर्यंत कोल्हापूर ८.०४ टक्के तर हातकणंगले ७.५५ टक्के मतदानाची नोंद

Fish Farming : पुनर्वसनग्रस्ताला मिळाला मत्सशेतीतून मोठा आधार

Turmeric Farming : हळदीची वाढली उत्पादकता

Farmer As Life Partner : आदर्शवत विवाहसोहळा

SCROLL FOR NEXT