Dada Bhuse
Dada Bhuse  
मुख्य बातम्या

चंदनाची सात-बारा उताऱ्यावर नोंद घ्या: दादा भुसे

टीम अॅग्रोवन

नगर ः शेतकऱ्यांना शेतात चंदन लागवड करण्यास शासनाची परवानगी आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी चंदनाची लागवड केली आहे, त्याची नोंद सात-बारा उताऱ्यावर घ्यावी, रखडलेल्या अनुदानाचा प्रश्‍न मार्गी लावावा, असे आदेश कृषिमंत्री दादा भुसे यांनी सचिवांना दिले.  आमदार नीलेश लंके आणि चंदन उत्पादक शेतकरी राजेंद्र गाडेकर यांनी मंत्री भुसे यांच्याकडे नोंदीसाठी पाठपुरावा केला. शेतकऱ्यांना चंदन लागवड करण्यासाठी दोन वर्षांपूर्वी शासनाची परवानगी मिळाली. त्यानुसार राज्यासह जिल्ह्यातील सुमारे ४००हून अधिक शेतकऱ्यांनी चंदनाची शेतात लागवड केली. मात्र लागवड केलेल्या चंदनाची सातबारावर नोंद घेण्याबाबत टाळाटाळ केली जात असल्याचे सातत्याने दिसून येत होते. याशिवाय चंदन लागवडीला अनुदान देय असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जात होते.  गेल्या दोन वर्षांपासून शेतकरी अनुदानासाठी पाठपुरावा करत असतानाही ते मिळत नसल्याची तक्रारी होत्या. त्यामुळे याबाबत आमदार लंके, शेतकरी गाडेकर यांनी मंत्री भुसे यांची चंदन लागवड प्रश्नावर भेट घेऊन त्यांना वस्तुस्थिती सांगितली. त्यानंतर मंत्री भुसे यांनी चंदन लागवडीची सात-बारा उताऱ्यावर नोंद घ्यावी, तातडीने रखडलेल्या अनुदानाचा प्रश्‍न मार्गी लावावा, अशा सूचना सचिवांना दिल्याचे श्री. गाडेकर यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sadabhau Khot : 'आधी कडकनाथवर बोला', भर सभेत शेतकऱ्यांचा सदाभाऊ खोतांना सवाल

Onion Export Ban : केंद्र सरकारच्या चलाखीमुळे कांदा निर्यातीवरील लगाम कायम; शेतकऱ्यांना कितीपत फायदा होणार?

Kolhapur Water Shortage : गावांना टँकरद्वारे पाण्याची गरज, लोकप्रतिनिधी, प्रशासन निवडणुक कामात व्यस्थ

Agriculture Industry : उद्योगाच्या घरी रिद्धी-सिद्धी...

Success Story : अल्पभूधारकांच्या शेतात फुलली हिरवाई

SCROLL FOR NEXT