Reduction in turmeric production in Sangli
Reduction in turmeric production in Sangli 
मुख्य बातम्या

सांगलीत हळदीच्या उत्पादनात घट

टीम अॅग्रोवन

सांगली : जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात आलेला महापूर आणि त्यानंतरच्या अतिवृष्टीतून वाचलेल्या हळदीची काढणी सुरू झाली आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे हळदीच्या उत्पादनात घट झाली आहे. आजअखेर ४० टक्के हळदीची काढणी झाली आहे. येत्या पंधरा ते वीस दिवसांत हळद काढणीचा हंगाम संपेल, असा अंदाज शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.

जिल्ह्यात अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर हळदीची लागवड गेली जाते. यंदा हळदीचे क्षेत्र १ हजार ३०० हेक्टर इतके आहे. गेल्या दोन वर्षांपेक्षा यंदा हळदीच्या क्षेत्रात सुमारे २०० हेक्टरने वाढ झाली असल्याचे हळद संशोधन केंद्राच्या सूत्रांनी सांगितले. जिल्ह्यात ७५ टक्के क्षेत्रावर सेलम, २० टक्के क्षेत्रावर कृष्णा, ५ टक्के क्षेत्रावर फुले स्वरूपा या जातींच्या हळदीची लागवड करण्यात येते. 

गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात महापूर आला, त्यामुळे वाळवा, पलूस, मिरज पूर्व भागातील हळदीची शेती पाण्याखाली होती. त्यानंतर अतिवृष्टी झाल्याने कंदकुजीचा प्रादुर्भाव झाला. त्यातून वाचलेले हळदीचे पीक चांगले होते. मात्र, त्यानंतर बदलत्या वातावरणाचा फटका हळदीला बसला. हळदीवर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला, त्यामुळे कंदकूज आणि करपा रोगामुळे हळदीचे उत्पादन घटले आहे.

हंगाम अंतिम टप्प्यात

सध्या जिल्ह्यातील पलूस, वाळवा, मिरज तालुक्याच्या पूर्व भागातील पिके वाया गेल्याने हळद उत्पादकांच्या हाती काहीच लागले नाही. इतर भागात हळदीची काढणी अंतिम टप्प्यात आली आहे. उशिरा लागवड केलेल्या हळदीची काढणी येत्या वीस ते पंचवीस दिवसांत पूर्ण होईल.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

Agriculture Share : शेती निम्म्या हिश्‍शाने देण्याकडे शेतकऱ्यांचा कल

Orchard Cultivation : ‘मनरेगा’अंतर्गत फळबाग लागवडीत कृषी विभाग अव्वल

Agrowon Sanvad : आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने शेती करावी

SCROLL FOR NEXT