Sharad Pawar  
मुख्य बातम्या

‘आरबीआय’चे नियंत्रण सहकार मोडीत काढण्यासाठीच : शरद पवार

सहकारी संस्थांवर रिझर्व्ह बॅंकेचे नियंत्रण वाढवून देशातील सहकार चळवळ हळूहळू मोडीत काढण्याकडे केंद्र सरकार वाटचाल करत आहे. देशाच्या इतिहासात प्रथमच इतक्‍या मोठ्या प्रमाणात इंधन दरवाढ होत आहे.

टीम अॅग्रोवन

सातारा : सहकारी संस्थांवर रिझर्व्ह बॅंकेचे नियंत्रण वाढवून देशातील सहकार चळवळ हळूहळू मोडीत काढण्याकडे केंद्र सरकार वाटचाल करत आहे. देशाच्या इतिहासात प्रथमच इतक्‍या मोठ्या प्रमाणात इंधन दरवाढ होत आहे. यावर कोरोनामुळे देशातील जनता सर्व काही सहन करतेय, अशीच भावना त्यांची झाली आहे. जनतेच्या भावनांचा गैरफायदा केंद्र सरकार घेत आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी सरकारवर केली. खासदार शरद पवार शनिवारी (ता. २७) रयत शिक्षण संस्थेच्या पदाधिकारी निवडीच्या निमित्ताने सातारा दौऱ्यावर होते. या वेळी त्यांनी शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. खासदार पवार म्हणाले, की सहकारी संस्थांवर रिझर्व्ह बॅंकेचे नियंत्रण वाढविले आहे. यातून देशातील सहकार चळवळ हळूहळू मोडीत काढण्याकडे केंद्र सरकार वाटचाल करत आहे. सहकारी संस्थांच्या निवडणुकाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत, या प्रश्‍नावर त्यांनी कोरोनात सोशल डिस्टिन्सिंग पाळले जाणार नाही परिणामी संसर्ग वाढण्याची भीती असल्याने राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे, तो योग्य आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

इंधनदरवाढीच्या प्रश्‍नावर बोलताना श्री. पवार म्हणाले, ‘‘पेट्रोल व डिझेलची दरवाढ दररोज होत आहे. भारताच्या इतिहासात इतक्‍या मोठ्याप्रमाणात इंधन दरवाढ पाहिली नव्हती. देशाची अर्थव्यवस्था संकटातून बाहेर पडण्याचे नियोजन करणे ही केंद्र सरकारची जबाबदारी आहे. इंधन दरवाढीचा सर्वाधिक परिणाम सर्वसामान्यांसह विविध घटकांवर दिसत असतो. पण, लॉकडाउनच्या काळात लोकांनी शासनाच्या विरोधात बोलणे सोडले आहे. त्याऐवजी परिस्थितीशी दोन हात करत जनता सर्व काही सहन करत आहे. जनता सर्व काही सहन करतेय अशीच भावना निर्माण मोदी सरकारची झाली आहे. जनतेच्या भावनेचा गैरफायदा केंद्र सरकार घेतंय.’’ भारत-चीनचा मुद्दा संवेदनशील भारत-चीनचा मुद्दा सध्या संवेदनशील बनला आहे. त्यामुळे १९६२ च्या भारत-चीन युध्दानंतर ४७ हजार किलोमीटरची आपली भूमी चीनने ताब्यात घेतली आहे. ती आज घेतलेली नाही. त्यामुळे देशाच्या सुरक्षेबाबत राजकारण नको, हा प्रश्‍न राजकारणाच्या पलीकडचा आहे, असे स्पष्ट मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी व्यक्त केले. भारत-चीन मधील संबंध सध्या दुरावलेले आहेत. यामध्ये भारत कमी पडला का, या प्रश्‍नावर श्री. पवार म्हणाले, मुळात भारत चीनचा प्रश्‍न हा संवेदशील आहे. गलवान खोऱ्यातून जाणारा रस्ता भारताने बनविलेला आहे. या रस्त्यावरून आपण सियाचिनमधील आपल्या भूभागात जाण्यासाठी वापर केला जातो. या रस्त्याच्या एका बाजूला चीन आणि दुसऱ्या बाजूला आपण आहोत. हा रस्ता भारताचा असूनही चीन सैन्य या काही वेळेसाठी रस्त्यावर येते. त्या वेळी दोन्हीकडच्या सैन्यात धरपकड होते. त्यातून धक्काबुकीचे प्रकार होतात.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Power Supply Disconnection: ३४ हजार वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडित

Labour Migration: मजुरांचे स्थलांतर रोखण्यासाठी सोयगावात १२० कामे मंजूर

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांना पीएम किसानचा पुढचा हप्ता कधी मिळेल?; जाणून घ्या संपूर्ण माहिती

E Crop Survey: आता ऑफलाइन करता येणार ‘ई-पीकपाहणी’: उज्ज्वला पांगरकर

E Crop Survey: ई-पीक पाहणी न झालेल्यांना दिलासा

SCROLL FOR NEXT