In Ratnagiri district, twenty thousand landowners have taken out insurance
In Ratnagiri district, twenty thousand landowners have taken out insurance 
मुख्य बातम्या

रत्नागिरी जिल्ह्यात वीस हजारांवर बागायतदारांनी उतरवला विमा

टीम अॅग्रोवन

रत्नागिरी : यंदा आंबा, काजू पीकविमा योजनेंतर्गत जिल्ह्यातील २० हजार ८९७ शेतकऱ्यांनी १६ हजार ९३६ हेक्टरवरील क्षेत्राचा विमा उतरवला आहे. गतवर्षीच्या तुलनेत साडेतीन हजार शेतकऱ्यांची वाढ झाली आहे. १ जानेवारी ते ३१ मे या कालावधीतील किमान, कमाल तापमानासह पावसामुळे होणाऱ्या नुकसानीपोटी विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांना या विम्यांतर्गत लाभ देण्यात येईल. 

शासनाने गतवर्षी २०१२ साली प्रायोगिक तत्त्वावर आंबा पीक विमा योजनेचा लाभ देण्यास सुरुवात केली. पहिल्यावर्षी कमी प्रतिसाद लाभला. त्यानंतर बागायतदारांची संख्या दरवर्षी वाढत आहे. कमी तापमान, अवेळी पावसाचा आणि उच्च तापमान यासह यंदा वाऱ्यामुळे होणाऱ्या नुकसानीचाही समावेश करण्यात आला आहे. यात राज्य व केंद्र शासनाचा समभाग आहे.

शेतकऱ्यांना हेक्टरी सहा हजार रुपये भरावे लागतात.  यंदा नोव्हेंबर अखेरपर्यंत विमा उतरवण्याची मुदत दिली गेली. त्याप्रमाणे बागायतदारांनी ९ कोटी ८३ लाख रुपये हप्त्यापोटी भरले. विमा संरक्षित रक्कम १९६ कोटी ७१ लाख रुपये इतकी आहे. त्यात काजू बागायतदार २,७६० असून २,२८० हेक्टरवरील विमा उतरविला आहे. त्यापोटी ९६ लाख रुपये हप्ता भरला. १८ हजार १३७ आंबा बागायतदारांनी १४ हजार ६५५ हेक्टरवरील विमा उतरवला. त्यांची हप्त्याची रक्कम ८ कोटी ८६ लाख रुपये आहे. 

गतवर्षी आंबा, काजू मिळून १७ हजार ४७३ शेतकऱ्यांनी विमा उतरवला. त्यातील ८००९ शेतकऱ्यांना १२ कोटी ८४ लाख रुपयांचे वाटप केले. यंदा साडेतीन हजार अधिक शेतकऱ्यांनी एक हजार हेक्टरवरील विमा उतरवला आहे. 

रत्नागिरी तालुक्यातील मजगाव येथील आंबा बागायतदार राजेंद्र कदम म्हणाले, ‘‘उच्च तापमानाचा निकष १५ मार्चनंतर ठेवण्यात आला आहे. यंदा १५ फेब्रुवारीला पारा उच्चतम होता. त्याचा परिणाम आंबा उत्पादनावर होणार आहे. त्यामुळे नुकसान होऊनही त्याचा लाभ विमा कंपन्यांकडून मिळणार नाही. याची नोंद घेऊन उच्च तापमान सरसकट ठेवले जावे.’’

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Book Review : ऋग्वेदाच्या पौराणिक अन् वैज्ञानिक स्पष्टीकरणाचा प्रयत्न

Drought Monitoring : दुष्काळ पाहणी पथकांचा सोपस्कार

Interview with Dashrath Tambale, Director of Atma : सेंद्रिय किंवा नैसर्गिक शेतीची सक्ती नाहीच...

Rural Story : जागरण

Sugarcane Management : खोडवा उसाचे व्यवस्थापन

SCROLL FOR NEXT