गुळ
गुळ 
मुख्य बातम्या

कोल्हापुरी गुळाचा गोडवा यंदा वाढणार

Raj Chougule

कोल्हापूर : यंदाच्या पावसाळ्यात गुजरात, राजस्थानच्या बाजारात कोल्हापुरी गुळाला मागणी राहिल्याने दोन्ही राज्यांतील कोल्हापुरी गुळाचा स्टॉक संपला आहे. यामुळे यंदाच्या हंगामात गुळाला चांगले दर मिळण्याची शक्‍यता आहे. सातत्याने दर घसरणीचा सामना करावा लागणाऱ्या गूळ उत्पादकांच्या दृष्टीने यंदाचा हंगाम नक्कीच गोड जाईल, अशी शक्‍यता गूळ उद्योगातून व्यक्त होत आहे.  कोल्हापुरी गुळाचे मार्केट मुख्यत्वे  करून गुजरात व राजस्थान आहे. हंगामात सुमारे पंचवीस लाख गूळ रव्यांचे उत्पादन होते. गेल्या वर्षी उत्तर प्रदेशात कारखाने सुरू होण्यास विलंब झाल्याने तेथे गुळाचे  उत्पादन वाढले. महाराष्ट्रातील गुळाच्या वाहतुकीपेक्षा गुजरात, राजस्थानला उत्तर प्रदेशातून कमी खर्चात गूळ उपलब्ध होत असल्याने कोल्हापुरी गुळासाठी ही चिंतेची बाब ठरली होती. उत्तर प्रदेशचा गूळ आल्याने तेथील व्यापाऱ्यांनी तिकडून गूळ घेऊनच शीतगृहात ठेवला होता.

यामुळे गेल्या वर्षी कोल्हापुरी गुळाला मागणी कमी राहिली. यातच कर्नाटकी गूळही त्यांना स्वस्त मिळत असल्याने प्रतिकूल परिणाम कोल्हापुरी गुळावर झाला. परंतु सरत्या पावसाळ्यात मात्र ग्राहकांकडून कोल्हापुरी गुळालाच जास्त मागणी राहिल्याने व्यापाऱ्यांनी हा गूळ विकण्यास प्रारंभ केला. यामुळे ज्या व्यपाऱ्यांनी कोल्हापूर भागातून गूळ खरेदी करून ठेवला होता. त्यांचा गूळ लवकर विकला गेला. कोल्हापुरी गुळापेक्षा कर्नाटकी, उत्तर प्रदेशचा गूळ क्विंटलला एक हजार रुपये गूळ स्वस्त असूनही ग्राहकांनी कोल्हापुरी गुळाला पसंती दिली. याचा सकारात्मक परिणाम यंदाच्या गूळ हंगामावर होणार आहे. याला व्यापारी सूत्रांनीही दुजोरा दिला आहे.  दरवाढीची शक्‍यता सध्या कोल्हापूर जिल्ह्यात उसासाठी संमिश्र हवामान आहे. सलग तीन महिने पाऊस राहिल्याने उसाचे मोठे नुकसान    झाले आहे, याचप्रमाणे हुमणी व अन्य    कीड रोगांमुळे उसाचे एकरी टनेज   घटण्याची शक्‍यता आहे. परिणामी गूळनिर्मितीही धीम्या गतीनेच होइल अशी शक्‍यता आहे. गुळाचे कमी उत्पादन व बाहेरच्या बाजारात मागणीची शक्‍यता गृहीत धरून यंदा दर चांगले रहातील, असा अंदाज आहे.  प्रतिक्रिया सध्या यंदाचा गूळ हंगाम प्राथमिक टप्प्यात आहे. यंदा गुळास क्विंटलला सुरवातीचा दर ३८०० रुपयांच्या आसपास आहे. गेल्या वर्षीपेक्षा हा दर शंभर ते दोनशे रुपयांनी जास्त आहे. जिल्ह्यातील एकूण परिस्थिती पाहता गेल्या वर्षीपेक्षा गुळाला क्विंटललला १०० ते २०० रुपये वाढतील, असा प्राथमिक अंदाज आहे. गेल्या वर्षी गुळाचा हंगामातील सरासरी दर ३००० ते ३१०० रुपये इतका होता. यंदा यात वाढ होण्याची शक्‍यता आहे.  - मोहन सालपे, सचिव, कोल्हापूर बाजार समिती

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

Kharif Sowing : साडेसात लाख हेक्टरवर जिल्ह्यात खरिपाचा पेरा

Shaktipeeth mahamarg : 'रस्त्यांवरच्या लढाईची शेतकऱ्यांनी तयारी करावी', शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची एकजूठ

SCROLL FOR NEXT