मी 35-40 रूपयांनी पेट्रोल-डिझेलची विक्री करेन
मी 35-40 रूपयांनी पेट्रोल-डिझेलची विक्री करेन 
मुख्य बातम्या

मी 35-40 रूपयांनी पेट्रोल-डिझेलची विक्री करेन

वृत्तसेवा

नवी दिल्ली : सध्या पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे मोदी सरकारवर टीका होत असतानाच, योगगुरू रामदेवबाबा यांनी 'मला परवानगी दिली तर मी 35-40 रूपयांनी पेट्रोल-डिझेलची विक्री करेन' असे वक्तव्य केले आहे. तसेच भाजपचा प्रचार करणार का असा सवाल केल्यावर त्यांनी 'आता भाजपचा प्रचार करणार नाही,' असे उत्तर दिले.  'मला पेट्रोल पंप चालवण्याची परवानगी व करात थोड्याफार प्रमाणात सवलत मिळाली तर 35-40 रुपये प्रति लिटरने पेट्रोल-डिझेल विकेन. सध्या महागाई वाढली आहे, ही महागाई कमी न झाल्यास भाजप सरकारला त्याचा चांगलाच तोटा होईल.' असे विधान रामदेवबाबांनी एनडीटीव्हीच्या कार्यक्रमात बोलताना केले. 2019 च्या निवडणूकीपूर्वीच पेट्रोल-डिझेलचे दर कमी करा असा सल्लाही मी मोदी सरकारला दिला आहे, असेही ते यावेळी म्हणाले. 

रामदेवबाबांनी दोन दिवसांपूर्वीच महागाईवरून व रूपयाने निच्चांक गाठल्याने, मोदी सरकारवर टीका केली होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Book Review : ऋग्वेदाच्या पौराणिक अन् वैज्ञानिक स्पष्टीकरणाचा प्रयत्न

Drought Monitoring : दुष्काळ पाहणी पथकांचा सोपस्कार

Interview with Dashrath Tambale, Director of Atma : सेंद्रिय किंवा नैसर्गिक शेतीची सक्ती नाहीच...

Rural Story : जागरण

Sugarcane Management : खोडवा उसाचे व्यवस्थापन

SCROLL FOR NEXT