राजू शेट्टी
राजू शेट्टी  
मुख्य बातम्या

साखर दरप्रश्‍नी राजू शेट्टी भेटणार केंद्रीय मंत्र्यांना

टीम अॅग्रोवन

कोल्हापूर  : साखरेच्या घसरत्या किमतीबाबत खासदार राजू शेट्टी आज (मंगळवार) केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू व रामविलास पासवान यांची भेट घेणार आहेत. देशात साखरेच्या खपात कोणत्याही प्रकारे कमी झालेली नसताना गत महिन्याभरात साखरेचे दर ५०० रुपये प्रतिक्विंटलने कमी झाले; मात्र किरकोळ बाजारातील साखर विक्रीचा दर एक रुपयादेखील कमी झालेला नाही, सोमवारीदेखील किरकोळ बाजारात ३८ रुपये प्रतिकिलो दराने साखर विक्री होत आहे.  पुढील काही दिवसांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील साखर उद्योगाचे शिष्टमंडळ नवी दिल्ली येथे जाणार आहे. साखरेच्या घसरलेल्या किमतीचा थेट फटका ऊस उत्पादकांना बसत असल्याचे श्री. शेट्टी यांनी सांगितले. राज्यातील काही साखर कारखान्यांनी मूठभर बड्या साखर खरेदीदारांना हाताशी धरून मोठ्या प्रमाणात दर पाडत साखर विक्री केल्याने त्याचा फटका राज्यातील इतर साखर कारखान्यांना बसत आहे. कमी दराने मोठ्या प्रमाणात साखर खरेदी करणारे कोण याची चौकशी करण्याची मागणी शेट्टी यांनी केली आहे.  दरवर्षी बड्या सट्टेबाजांमुळे लहान साखर खरेदीदारांची कोंडी केली जात असल्याची व्यथा काही साखर खरेदीदारांनी आपल्याकडे मांडल्याचे त्यांनी सांगितले. यंदा देशात गरजेइतकेच साखर उत्पादन होणार असताना साखरेच्या दरात थेट ५०० रुपये प्रतिक्विंटल घट कशी होते? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. साखरेचे दर कमी होतात; मात्र इतर वस्तूंचे दर कमी होत नाहीत. त्यामुळे ही एक प्रकारे शेतकऱ्यांची लूट असल्याने सरकारने त्वरित यात लक्ष घालत साखरेचे दर पडणाऱ्या टोळक्याचा बंदोबस्त करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage : एप्रिलमध्ये पिकांचे २७ कोटींचे नुकसान

Agriculture Irrigation : आक्रोश मोर्चाचे रूपांतर उपोषणात

Cotton Cultivation : सरासरीच्या तुलनेत यंदा कपाशीची लागवड वाढणार

Book Review : ऋग्वेदाच्या पौराणिक अन् वैज्ञानिक स्पष्टीकरणाचा प्रयत्न

Drought Monitoring : दुष्काळ पाहणी पथकांचा सोपस्कार

SCROLL FOR NEXT