poultry  
मुख्य बातम्या

आमच्या व्यथा शासनदरबारी मांडा : पोल्ट्री व्यावसायिकांच्या सभेत मागणी

पोल्ट्री व्यावसायिकांचा प्रश्न शासनदरबारी मांडून त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल. - डॉ. अजित नवले, किसान सभा

टीम अॅग्रोवन

वैजापूर, जि. औरंगाबाद : कोरोना व्हायरसच्या अफवेमुळे पोल्ट्री उद्योग बुडाला आहे. पोल्ट्रीधारकांवर ओढवलेल्या या संकटातून त्यांना सावरण्यासाठी व शेतीपूरक पोल्ट्री उद्योग पुन्हा उभा करण्यासाठी मदतीचा आधार मिळावा म्हणून आमच्या व्यथा शासनदरबारी मांडण्याची हाक पोल्ट्री व्यावसायिकांनी वैजापूर येथील पोल्ट्री व्यावसायिकांच्या सभेत सोमवारी (ता. १६) दिली.  वैजापूर पंचायत समितीच्या सभागृहात सोमवारी झालेल्या या सभेला किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले, शेतकरी नेते धनंजय धोर्डे यांच्यासह ज्ञानेश्वर पाटील जगताप, दीपक राजपूत, सुचनरन छानवाल, उपसभापती राजेंद्र मगर, बाळासाहेब भोसले, सूरज पवार, दत्तू त्रिभुवन, भागीनाथ मगर, इम्रान भाई, सोमनाथ मगर, वाजेद कुरेशी, गणेश डिके, राजेंद्र डांगे, समाधान जाधव यांच्यासह वैजापूर तालुक्‍यातील, तसेच लगतच्या नगर जिल्ह्यातील पोल्ट्रीधारकांची उपस्थिती होती.  कोरोना व्हायरसच्या अफवेमुळे लोकांनी चिकन खाणे सोडून दिले, त्यामुळे पोल्ट्री उद्योजक शेतकरी अडचणीत आला आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी कंपन्यांबरोबर करार केलेला आहे. परंतु कंपन्या शेतकऱ्यांना पैसे देत नाहीत. बॅंकांची सक्‍तीची वसुली सुरू आहे, त्यामुळे त्रस्त झालेल्या पोल्ट्रीधारक शेतकऱ्यांच्या मागण्या शासन दरबारी पोहोचविण्याची व केंद्र सरकारसह राज्य शासनाकडूनही पोल्ट्रीधारकांना मदत देण्याची तरतूद करण्याची मागणी पोल्ट्रीधारकांनी केली आहे. त्यासाठी पक्षविरहित पोल्ट्रीधारक कृती समितीच्या माध्यमातून पाठपुरावा करण्याची अपेक्षाही या सहविचार सभेतून केली गेली.  या मागण्या मांडण्यात आल्या 

  • पोल्ट्री उद्योगाचे वीजबिल माफ करावे
  • प्रतिपक्षी १०० रुपये अनुदान द्यावे 
  • बॅंकेची वसुली थांबवावी व कर्जावरील व्याज माफ करावे 
  • पोल्ट्रीसाठी लागणाऱ्या भुश्शासाठी कायमस्वरूपी अनुदान द्यावे 
  • शेतीपूरक उद्योग असल्याने नवीन उद्योग सुरू करण्यासाठी बॅंकेकडून बिनव्याजी कर्ज मिळावे
  • प्रतिक्रिया या संकटसमयी राज्यातील सर्व राजकीय पक्षांनी पोल्ट्रीधारकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रeहावे. राज्य शासनाने नुकसानग्रस्त पोल्ट्रीधारकांना तत्काळ मदत देण्याची तरतूद करावी.  - धनजंय धोर्डे, शेतकरी नेते

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेतील ९२ हजारांहून अधिक अपात्र लाभार्थ्यांकडून वसुलीची मागणी; १५ दिवसांची मुदत

    Nashik Sugar Factory Crisis : ‘नासाका’चा १७ कोटींचा ऊस बिल घोटाळा? शेतकऱ्यांची थकीत पैशांसाठी चौकशीची मागणी!

    Heat Stress in Cattle: जनावरांमध्ये उष्णतेच्या ताणाचे ६ परिणाम, उष्णतेचा ताण कसा ओळखावा; लक्षणे काय?

    Nanded Farmer Death: पीक गेलं, कर्ज वाढलं, मुलीच्या शिक्षणाचा खर्चही पेलवेना; नांदेडमध्ये अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या

    Annapurti Grain ATM : आता रेशनसाठी रांगेत उभे राहण्याची गरज नाही; नाशिकमध्ये 'अन्नपूर्ती धान्य एटीएम'ची डिजिटल क्रांती

    SCROLL FOR NEXT