Maharashtra Rural Crisis: नांदेड जिल्ह्यातील बोरगाव येथे शंकर आबानराव क्षीरसागर (वय ४६) या अल्पभूधारक शेतकऱ्याने सोमवारी (ता. १९) आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. पावसाच्या खंडामुळे त्यांच्या शेतातील सोयाबीन पिकाचेनुकसान झाले होते. त्यामुळे शेतीतून उत्पन्न मिळण्याची आशा मावळली होती. त्यातच कर्जाची परतफेड आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची चिंता यामुळे ते आर्थिक अडचणींचा सामना करत होते..क्षीरसागर यांच्या कुटुंबात पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा आहे. त्यांची एक मुलगी वैद्यकीय शिक्षण घेत आहे. शेतीतून उत्पन्न मिळत नसताना कुटुंबाचा खर्च भागवणे आणि मुलीच्या वैद्यकीय शिक्षणाची फी भरणे, अशी आव्हाने त्यांच्यासमोर होती. पीक नुकसान आणि वाढत्या आर्थिक अडचणींमुळे त्यांच्या कुटुंबावर संकट ओढवले होते..Maharashtra Farmer Death: शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबविण्यासाठी उपाययोजना करा; रघुनाथदादा पाटील यांचे मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र.मृत्यूपूर्वी क्षीरसागर यांनी सोशल मीडियावर एक भावनिक व्हिडीओ शेअर करून आपली व्यथा मांडली होती. त्यात कर्जमाफी, विविध शासकीय योजना आणि विद्यार्थ्यांच्या शुल्कमाफीची घोषणा केली असली, तरी प्रत्यक्षात त्याचा लाभ मिळत नसल्याची खंत त्यांनी या व्हिडीओत व्यक्त केली होती..Farmer Death: आत्महत्येनंतर मृतदेह थेट जिल्हाधिकारी कार्यालयात.शंकर क्षीरसागर यांनी व्हिडीओमध्ये जिल्हाधिकाऱ्यांना आपली अडचण सांगितली होती. त् तीन वेळा कर्जमाफी झाली, तरी कर्जमाफीच्या एका यादीतही आपले नाव आले नाही, असे त्यांनी म्हटले आहे. माझ्या बाबतीत असे का झाले, या समस्येची सरकारने गांभीर्याने चौकशी करावी, अशी विनंतीही त्यांनी केली होती..तसेच, सरकार विद्यार्थ्यांची फी माफ करत असल्याचे सांगते. पण माझी मुलगी शिवानी वैद्यकीय शिक्षण घेत आहे. तिच्या फीमाफीसाठी अर्ज करूनही आम्हाला त्याचा लाभ मिळाला नाही, असेही त्यांनी व्हिडीओमध्ये सांगितले होते. त्यामुळे कलेक्टर साहेबांनी या दोन्ही बाबींची चौकशी करावी, अशी विनंती त्यांनी केली होती. .दरम्यान, हा सर्व प्रकार दुपारी क्षीरसागर शेतात गेले तेव्हा घडला. शेतात गेल्यानेतर तेथे त्यांनी मोबाईलवर स्वतःचा व्हिडीओ रेकॉर्ड करून सोशल मीडियावर पोस्ट केला. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नातेवाईक आणि पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला. मात्र, ते घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच क्षीरसागर यांचा मृत्यू झाला होता..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.