सांगली जिल्ह्यात द्राक्ष पट्ट्याला पावसाने झोडपले
सांगली जिल्ह्यात द्राक्ष पट्ट्याला पावसाने झोडपले 
मुख्य बातम्या

सांगली जिल्ह्यात द्राक्ष पट्ट्याला पावसाने झोडपले

टीम अॅग्रोवन

सांगली : श्रीलंका, तमिळनाडू किनाऱ्यालगतच्या समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असल्याने कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या जिल्ह्यांतही पावसाचा फटका बसतो आहे. तासगाव, मिरज पूर्व आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील द्राक्ष पट्ट्यातच मंगळवारी पहाटे जोरदार पावसाने झोडपले. जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील मणेराजुरी, सावळज, सावर्डे, आरवडे, डोंगरसोनी, मिरज तालुक्यातील एरंडोली, शिपूर परिसरात जोरदार पावसाने फुलोऱ्यातील द्राक्ष बागांना जोरदार फटका बसला. कवठेमहांकाळ तालुक्यातील घाटनांद्रे, नागज परिसरातही पाऊस झाला.द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी वाढताहेत. जिल्ह्यात द्राक्षाचे क्षेत्र १ लाख २५ हजार एकर आहे. फळछाटणी अंतिम टप्प्यात आली आहे. आगप फळछाटणी २५ ते ३० हजार एकर क्षेत्रावरील बागा सध्या फुलोरावस्थेत आहेत. या पावसाचा फटका द्राक्ष बागेला बसला आहे. पोंगा, फुलोऱ्यातील द्राक्ष बागांना फटका बसणार आहे. सकाळपासून ढगाळ वातावरण होते. त्यामुळे इतर भागांत रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी शेतकरी फवारणी करू लागले आहेत. वातावरण असेच राहिले तर डाऊनीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage : एप्रिलमध्ये पिकांचे २७ कोटींचे नुकसान

Agriculture Irrigation : आक्रोश मोर्चाचे रूपांतर उपोषणात

Cotton Cultivation : सरासरीच्या तुलनेत यंदा कपाशीची लागवड वाढणार

Book Review : ऋग्वेदाच्या पौराणिक अन् वैज्ञानिक स्पष्टीकरणाचा प्रयत्न

Drought Monitoring : दुष्काळ पाहणी पथकांचा सोपस्कार

SCROLL FOR NEXT