Rainfall in Ratnagiri district
Rainfall in Ratnagiri district 
मुख्य बातम्या

रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची उघडीप

टीम अॅग्रोवन

रत्नागिरी : कोकणातील पावसाचा जोर ओसरला आहे. शुक्रवारी (ता. १६) उघडीप मिळाली असून भिजलेले भात मोकळ्या मैदानात सुकायला ठेवण्यासाठीची धडपडत जिल्ह्यात सगळीकडे सुरू झाली आहे. हातातोंडाशी आलेलं पीक पावसात वाया गेल्याने कोकणातील शेतकरी हताश झाला आहे.

कृषी विभागाकडून नुकसान झालेल्या भात शेतीचे पंचनामे करण्याचे काम वेगाने सुरू झाले आहे. कृषी सहायकांना प्रत्यक्ष शेतात जाऊन पंचनामे करा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर तालुक्यातील अर्जुना, कोदवली नद्यांच्या, लांजामध्ये मुचकुंदी, रत्नागिरीत काजळी, बावनदी, संगमेश्वरला शास्त्री या नदीच्या किनारी भागातील भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे.

रत्नागिरी तालुक्यात रात्रीही पाऊस सुरूच होता. शुक्रवारी सकाळी उघडीप मिळाली असली तरीही ढगाळ वातावरण होते. पावसात भिजलेले भात मळ्यातून बाजूला काढण्याची धडपडत शेतकरी करत होते. कजरघाटी येथे बाळकृष्ण शिंदे यांनी ओलं झालेलं भात तसंच झोडायला सुरुवात केली. तीन महिन्यांच्या मेहनतीवर पाणी फेरल्यामुळे शेतकऱ्यांनी अवस्था बिकट झाली आहे.  या पावसाने रत्नागिरी तालुक्यातील चांदेराई,  हरचेरी, पोमेंडी, कजरघाटी,  सोमेश्वर, निवळी, कोंडवी,  बावनदी यासह लांजा, राजापूर, संगमेश्वर तालुक्यात पावसानं शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे.

नदीकिनारी असणारी भात शेती पूर्ण पाण्याखाली गेली वाहून गेली. विमा काढलेल्या शेतकऱ्यांना अनेक अडथळ्याचा सामना करावा लागत आहे. टोल फ्री क्रमांक बीझी लागत असून एकावेळी एका शेतकऱ्याला माहिती देण्याचं बंधन असल्यामुळे अशिक्षित शेतकऱ्यांची तारांबळ उडत आहे.

मेहनत वाया गेलीय, पण भिजलेले भात वाळवून सुकवायचं. त्यातून काहीच हाताला लागणार नाही. काही मिळणार नाही,  त्यापेक्षा भात झोडून कण्या मिळतील. - बाळकृष्ण शिंदे, कजरघाटी शेतकरी

खूप शेतकरी अश्रू गाळत आहेत. या घटनेकडे गांभीर्याने लक्ष देऊन ओला दुष्काळ जाहीर करावा व शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळवून द्यावी. -  सुयोग उर्फ दादा दळी, चांदेराई, माजी सरपंच

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Season : देशातील साखर हंगाम अंतिम टप्प्यात

Weather Update : कोकणात उन्हाचा चटका ठरणार तापदायक

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

SCROLL FOR NEXT