Rainfall in Igatpuri taluka affected 2852 farmers
Rainfall in Igatpuri taluka affected 2852 farmers 
मुख्य बातम्या

इगतपुरी तालुक्यात पावसामुळे २८५२ शेतकऱ्यांचे नुकसान

टीम अॅग्रोवन

नाशिक : जिल्ह्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे पिकांची दाणादाण झाली आहे. यामध्ये जिरायती व बागायती पिकांसह बहुवार्षिक फळपिकांना मोठा फटका बसला आहे.

जिल्ह्यात अतिवृष्टी व वादळ वाऱ्यामुळे ६ हजार ७५५ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने जाहीर  केला आहे. यात २८५२ शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले आहे. 

मागील सप्ताहात झालेल्या पावसामुळे सर्वाधिक नुकसान भात व कांदा पिकांचे आहे. त्यानंतर मका व सोयाबीनचे नुकसान आहे. प्रत्यक्षात नुकसान अधिक असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. जिल्हाभर हे नुकसान कमी, अधिक असून इगतपुरी तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे.

१२०० शेतकऱ्यांच्या ५८०० हेक्टर क्षेत्रावर भात पिकांचे सर्वात अधिक नुकसान आहे. यानंतर सटाणा तालुक्यात ४५२ हेक्टर कांदा लागवडी बाधित झाल्या आहेत. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ३५० हेक्टरवर भात पिकांचे नुकसान झाले आहे.

देवळा, दिंडोरी, नाशिक तालुक्यातील अनेक भागात नुकसान झाल्याचे प्राथमिक अहवालात सांगण्यात आले आहे. मात्र इतर तालुक्यात या पावसामुळे नुकसान नसले, तरी ऑगस्ट महिन्यात मोठा फटका बसला आहे. यासह भाजीपाला व द्राक्ष पिकांना गोडी बहार छाटणीच्या नंतरच फटका बसल्याने घड जिरू लागल्याचे प्रमाण वाढते आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update : विदर्भात गारपिटीचा इशारा

Agriculture Update : गुणवत्तापूर्ण बियाणे, खते शेतकऱ्यांना द्या : इटनकर

Summer Weather : परभणीत दिवसाचा पारा ४३ अंशांवर

Water Stock : मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ७ ते ८ टक्क्यांवर

Flower Rate : लग्नसराईमुळे फुलांच्या दरांत वाढ

SCROLL FOR NEXT