मुख्य बातम्या

वऱ्हाडात पिकांचे नुकसान; प्रकल्पांतील पाणीसाठ्यात वाढ

Gopal Hage

अकोला : गेल्या तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. तसेच कमी-अधिक प्रमाणात पाऊसदेखील झाला आहे. शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत वऱ्हाडात प्रामुख्याने बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद, संग्रामपूर, चिखली, बुलडाणा, देऊळगावराजा, नांदुरा, मलकापूर, अकोला जिल्ह्यातील तेल्हारा, अकोट या तालुक्‍यात पाऊस पडला. प्रामुख्याने संग्रामपूर तालुक्‍यात पावसाचा जोर अधिक होता.

पावसासोबतच वादळी वाऱ्यामुळे पिकांचे नुकसान झाले आहे.या तालुक्‍यातील काही भागात शेकडो एकरातील कपाशी, तीळ, बाजरी, ज्वारी, मका पिके जमीनदोस्त झाली. कपाशीच्या झाडांवर बोंड्या लागलेल्या असून याचे नुकसान होण्याची भीती वाढली आहे. नांदुरा तालुक्‍यात मॉन्सूनपूर्व लागवड झालेल्या कपाशीचे अतोनात नुकसान झाले. तेल्हारा तालुक्‍यात कपाशीच्या बोंड्या काळवंडल्या असल्याने वेचणीला आलेला कापूस शेतकऱ्यांच्या हातातून गेला आहे. या तालुक्‍यात कपाशीची लागवड वाढली होती. उडदाच्या पिकाची सोंगणी काही भागात सुरू झाली होती. परंतु, या पावसामुळे हे काम ठप्प झाले. वाळलेल्या शेंगामधून अंकुर बाहेर पडत आहेत.

या पावसामुळे प्रकल्पांना थोडाफार दिलासा मिळाला. प्रामुख्याने बुलडाणा जिल्ह्यातील काही प्रकल्पांच्या जलसाठ्यात वाढ झाल्याची नोंद आहे. नळगंगा, पेनटाकळी, खडकपूर्णा, पलढग, ज्ञानगंगा, मस, कोराडी, मन, तोरणा या प्रकल्पांमधील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. शिवाय ‘जलयुक्त’च्या कामांमध्ये सुद्धा पाण्याचा संचय झाला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update : अकोला, सोलापुरात हंगामातील उच्चांकी तापमान

Indian Politics : चीनवरून काँग्रेसचा मोदी सरकारवर पुन्हा हल्लाबोल

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

SCROLL FOR NEXT