mavitaran
mavitaran 
मुख्य बातम्या

वादळी पावसाचा महावितरणला तडाखा

टीम अॅग्रोवन

कोल्हापूर : जिल्ह्यात गुरुवारी (ता.१) रात्री साडेदहाच्या सुमारास झालेल्या प्रचंड वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने मोठमोठे वृक्ष वीजवाहिन्यांवर उन्मळून पडल्याने कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील अनेक भागाला याचा प्रचंड तडाखा बसला आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार महावितरणचे ४५४ वीज खांब जमीनदोस्त झाले आहेत. तर हजारो खांबावरील तारा तुटल्या आहेत. अशा परिरिस्थितीतही वीज कर्मचाऱ्यांनी आज दिवसभरात शहर व गावठाणचा वीजपुरवठा युद्धपातळीवर सुरळीत केला आहे. महावितरणच्या मागील संकटाची मालिका काही केल्या कमी होत नाही. आधी महापूर आणि आता अवकाळी पावसाच्या तडाख्यामुळे वीज यंत्रणेला मोठा फटका बसला आहे. त्यात अवकाळीने भर घातली आहे. कोल्हापूर शहरातील शिरोली एमआयडीसी, कसबा बावडा, शिये, भुये, वडगणे या भागात जुने व मोठमोठे वृक्ष मुळासकट उन्मळून वीजवाहिन्यांवर पडले. एमआयडीसी भागातील पत्र्यांची शेड तारांवर अडकले. सर्वात मजबूत समजले जाणारे ‘रेल पोल’ सुध्दा अक्षरश: मोडून पडले. एमआयडीसीतील बहुतांश उद्योग लॉकडाऊनमुळे बंद असले तरी वृत्तपत्र व आदी औद्योगिक ग्राहक ज्यांना लॉकडाऊनमधून वगळले आहे, त्यांचा वीजपुरवठा मार्केटयार्ड उपविभागाने रात्रीतून सुरु केला. कसबा बावडा व नागाळापार्क भागाला जिथे शक्य आहे, तिथे पर्यायी मार्गाने सुरु करण्यात आले आहे. गडहिंग्लज शहर पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा शुक्रवारी दुपारी युध्दपातळीवर पूर्ववत करण्यात आला. प्राथमिक माहितीनुसार गुरुवारी रात्रीच्या अवकाळी पावसात उच्चदाबाचे १७० व लघुदाबाचे २८४ असे ४५४ वीजखांब पडले होते. तर ११ रोहित्रसुध्दा जमीनदोस्त झाले आहेत. विजेच्या कडकडामुळे शेकडो खांबावरील ‘इन्सुलेटर’ फुटून तारा खांबावर निखळून पडल्या आहेत. लॉकडाऊनमुळे कंत्राटदारांना कामगार मिळत नसल्याने काल रात्रीपासून कर्मचारी अहोरात्र झटत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT