कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता
कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता 
मुख्य बातम्या

कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता

वृत्तसेवा

पुणे : पावसाला पोषक हवामान असल्याने कोकण, मध्य महाराष्ट्र पावसाने हजेरी लावली. राज्याच्या कमाल आणि किमान तापमानासह उकाड्यात वाढ झाली आहे. आज (ता.७) कोकण, मध्य महाराष्ट्रात वीजा, मेघगर्जना, जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

कमी दाब क्षेत्रामुळे अरबी समुद्रात ढगांची दाटी झाली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात ढगाळ हवामान झाले असून, तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली आहे. शनिवारी (ता. ६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मध्य महाराष्ट्रातील नाशिक येथे ३० मिलिमीटर, आजरा २०, त्र्यंबकेश्वर १० मिलिमीटर तर कोकणातील हर्णे येथे २० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. 

राज्याच्या कमाल व किमान तापमानात वाढ झाली आहे. शनिवारी (ता. ५) गडचिरोली येथे नीचांकी १६.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर सांताक्रूज येथे उच्चांकी कमाल ३७.० अंश सेल्सिअस तापमानाची नोंदले गेले.  

शनिवारी (ता. ६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :  पुणे ३१.४ (२०.८), जळगाव ३२.८(१७.२), कोल्हापूर ३२.० (२३.०), महाबळेश्वर २४.४(१७.३), मालेगाव ३१.४ (१९.०), नाशिक ३१.१ (२०.४), सांगली ३३.२(२४.३), सातारा ३१.६(२१.०), सोलापूर ३३.२ (१९.४), सांताक्रूझ ३७.०(२५.४), अलिबाग ३३.७ (-), डहाणू ३५.१ (२५.४), रत्नागिरी ३५.४ (२४.६), औरंगाबाद ३१.६ (१९.८), नांदेड ३२.२ (२०.०), परभणी ३२.० (२०.५), अकोला ३६.६ (१९.४), अमरावती ३२.२ (१७.१), ब्रह्मपुरी ३४.३ (१८.६), बुलडाणा ३१.० (१७.६), चंद्रपूर ३२.२ (१९.४), गडचिरोली -(१६.६), गोंदिया ३१.२ (१६.८), नागपूर ३१.७ (१७.७), वर्धा -(१८.९), वाशीम ३१.० (१९.०), यवतमाळ ३१.० (१९.०).

वीजा, मेघगर्जनेसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) : कोकण : सिंधुदुर्ग, रत्नागिरी.

कमी दाब क्षेत्र झाले ठळक पूर्वमध्य अरबी समुद्रात केरळ, कर्नाटकच्या किनारपट्टीलगत सक्रिय असलेल्या कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढली आहे. उत्तरेकडे सरकत असलेली हे ठळक कमी दाब क्षेत्र आज (ता.७) आणखी तीव्र होण्याचे संकेत आहेत. या कमी दाब क्षेत्रापासून दक्षिण गुजरातच्या किनाऱ्यापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. मंगळवारपर्यंत (ता.९) बंगालच्या उपसागरात नव्याने कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे व भारताच्या किनाऱ्याकडे येताना त्याची तीव्रता वाढण्याचे संकेत आहेत.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orange Farmer : निवडणूक काळात संत्रा उत्पादक उपेक्षित

Chara Chavani : चारा छावण्या सुरू करण्याची पशुपालकांची मागणी

Cotton Sowing : महाराष्ट्रात कापसाचा पेरा राहणार ४२ लाख हेक्टरवर

Animal Heat Stress : वाढत्या उष्म्याचा पशुधनाला धोका

Agriculture Technology : शेती तंत्रज्ञान, पिकांबाबत शेतकरी साक्षर असणे गरजेचे

SCROLL FOR NEXT