कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता
कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता 
मुख्य बातम्या

कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता

वृत्तसेवा

पुणे : कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. गेल्या काही दिवसांपासून थंडी गायब झाली असून, ढगाळ हवामानामुळे उकाड्यात मोठी वाढ झाली आहे. आज (ता.६) कोकण, मध्य महाराष्ट्रात विजा, मेघगर्जना, जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता अंदाज हवामान विभागाने वर्तविली आहे.

दक्षिण भारतातील राज्यांमध्ये सध्या जोरदार पाऊस पडत आहे. तर कमी दाब क्षेत्रामुळे अरबी समुद्रात ढगांची दाटी झाली आहे. महाराष्ट्रात अंशतः ढगाळ हवामान होत असून, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली आहे. मध्य महाराष्ट्रातील चिंचवड येथे ६० मिलीमीटर, तळेगाव ४०, सातारा १० मिलीमीटर, कोकणातील मुलदे येथे २० मिलीमीटर, तर मराठवाड्यातील देगलूर येथे ३० मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

दरम्यान पावसाला पोषक हवामान असल्याने तापमानात चढ-उतार सुरू असून, शुक्रवारी (ता. ५) वाशिम येथे हंगामातील निचांकी १०.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर रत्नागिरी येथे उच्चांकी कमाल ३६.० अंश सल्सिअस तापमानाची नोंदले गेले.  

शुक्रवारी (ता. ५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३१.७ (१९.१), जळगाव ३२.५(१७.६), कोल्हापूर ३१.२ (२३.०), महाबळेश्वर २३.६(१७.७), मालेगाव ३१.४ (१६.६), नाशिक ३०.५ (१७.६), सांगली ३२.७(२३.१), सातारा ३२.१(२१.१), सोलापूर ३४.० (२०.५), सांताक्रूझ ३५.०(२५.०), अलिबाग - (२४.०), डहाणू ३१.६ (२३.६), रत्नागिरी ३६.० (२३.८), औरंगाबाद ३०.६ (१८.७), नांदेड - (२१.०), परभणी ३२.० (२०.५), अकोला ३२.८ (२०.९), अमरावती ३२.६ (१८.१), ब्रह्मपूरी ३४.३ (२०.२), बुलडाणा ३१.० (१८.६), चंद्रपूर ३०.८ (१८.०), गडचिरोली ३२.४(१९.६), गोंदिया ३१.० (१९.०), नागपूर ३२.० (१७.४), वर्धा ३१.९(१९.८), वाशीम १६.० (१०.१), यवतमाळ ३२.० (२०.०).

विजा, मेघगर्जनेसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) : कोकण : रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी. मध्य महाराष्ट्र : पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर.

कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढतेय लक्षद्वीप बेटे आणि अग्नेय अरबी समुद्रात सक्रिय असलेल्या कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढत आहेय उत्तरेकडे सरकणारी ही प्रणाली आज (ता.६) ठळक होणार असून, उद्यापर्यंत (ता.७) आणखी तीव्र होण्याचे संकेत आहेत. या कमी दाब क्षेत्रापासून दक्षिण गुजरातच्या किनाऱ्यापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. मंगळवारपर्यंत (ता.९) बंगालच्या उपसागरात नव्याने कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Season : देशातील साखर हंगाम अंतिम टप्प्यात

Weather Update : कोकणात उन्हाचा चटका ठरणार तापदायक

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

SCROLL FOR NEXT