Hawaman
Hawaman  
मुख्य बातम्या

तुरळक ठिकाणी पाऊस शक्य 

टीम अॅग्रोवन

पुणे ः गेल्या पाच ते सहा दिवसांपासून राज्यात ढगाळ वातावरणाची स्थिती आहे. यामुळे तुरळक ठिकाणी हलक्या सरी बरसत आहेत. गुरुवारी (ता. ७) नाशिक, पुणे भागांत पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. सोमवारपर्यंत राज्यात ढगाळ वातावरण राहणार असून, तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला. 

अरबी समुद्र ते मध्य महाराष्ट्र या भागात कमी दाबाचा पट्टाचा असल्याने राज्यात ढगाळ हवामान आहे. तसेच दक्षिण गुजरातची किनारपट्टी, पूर्व राजस्थान आणि सौराष्ट्र कच्छ या भागातही कमी दाबाचा पट्टा आहे. हा पट्टा पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे सक्रिय झाला आहे. यामुळे राज्यात गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण होत आहे. यामुळे मागील तीन दिवसांपासून तुरळक ठिकाणी पावसाचा शिडकावादेखील होत आहे. 

ढगाळ हवामानामुळे वातावरणात वेगाने बदल होत आहेत. राज्यात अधूनमधून ऊन तर कधी कधी ढगाळ वातावरण तयार होत आहे. रात्री उकाडा वाढत असल्याने थंडी अचानक कमी झाल्याने किमान तापमानात चांगलीच वाढ झाली आहे. सध्या राज्यात किमान तापमान १६ ते २३ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे.  येत्या काही दिवसांत राज्यात थंडी कमी स्वरूपाची राहणार आहे. गुरुवारी (ता. ६) सकाळी आठ वाजेपर्यंत महाबळेश्‍वर १६.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.    या जिल्ह्यात पाऊस होऊ शकतो ः  शुक्रवार : ठाणे, पालघर, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, औरंगाबाद, बीड, बुलडाणा, अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, वाशीम, यवतमाळ.  शनिवार : ठाणे, पालघर, मुंबई, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, औरंगाबाद, बीड.  रविवार ः पालघर, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, धुळे, नाशिक, नगर, पुणे, कोल्हापूर, सातारा.  सोमवार ः पालघर, पुणे, कोल्हापूर, सातारा. 

गुरुवारी (ता.७) सकाळपर्यंत विविध शहरांतील किमान तापमान, कंसात वाढ, घट झालेले तापमान, अंश सेल्सिअसमध्ये ः 

  • मुंबई (सांताक्रूझ) १९.८ (२) 
  • अलिबाग २०.६ (३) 
  • रत्नागिरी २३.५ (४) 
  • डहाणू १९.७ (२) 
  • पुणे १८ (७) 
  • जळगाव १९.२ (७) 
  • कोल्हापूर २१.३ (७) 
  • महाबळेश्वर १६.६ (३) 
  • मालेगाव २०.२ (९) 
  • नाशिक १७.४ (७) 
  • सांगली २२.१ (८) 
  • सातारा १९.७ (७) 
  • सोलापूर २१.४ (५) 
  • औरंगाबाद १९.२ (७) 
  • बीड २१.८ (८) 
  • परभणी १९.६ (५) 
  • नांदेड २१ (८) 
  • उस्मानाबाद १७.७ (४) 
  • अकोला २०.१ (६) 
  • अमरावती १९.५ (३) 
  • बुलडाणा १८.८ (४) 
  • चंद्रपूर १८.४ (४) 
  • गोंदिया १७.६ (५) 
  • नागपूर १८ (५) 
  • वर्धा २० (७) 
  • यवतमाळ १७.५ (३) 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Orange Farmer : निवडणूक काळात संत्रा उत्पादक उपेक्षित

    Chara Chavani : चारा छावण्या सुरू करण्याची पशुपालकांची मागणी

    Cotton Sowing : महाराष्ट्रात कापसाचा पेरा राहणार ४२ लाख हेक्टरवर

    Animal Heat Stress : वाढत्या उष्म्याचा पशुधनाला धोका

    Agriculture Technology : शेती तंत्रज्ञान, पिकांबाबत शेतकरी साक्षर असणे गरजेचे

    SCROLL FOR NEXT