rain possibility
rain possibility  
मुख्य बातम्या

तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज

टीम अॅग्रोवन

पुणे ः गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील अनेक भागांत ढगाळ हवामानाची स्थिती कायम आहे. सोमवारी (ता. २३) सायंकाळी नाशिक जिल्ह्यातील सटाणा येथे हलका पाऊस पडला. यामुळे बागायतदार शेतकरी धास्तावले आहेत. ढगाळ हवामानामुळे पहाटेचा गारठा गायब झाला आहे. परिणामी, किमान तापमानात किंचित वाढ झाली आहे. आज (ता. २५) उद्या (ता. २६) मध्य कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे. दोन ते तीन दिवसांपूर्वी अरबी समुद्राच्या नैर्ऋत्य भागात कमी दाबाचे क्षेत्र, तर हिंदी महासागरात चक्रावाताची स्थिती अजूनही कायम आहे. यामुळे गेल्या दोन दिवसापासून ढगाळ हवामान आहे. राज्यातील अनेक भागात पहाटेचा गारठा कमी झाला असून, किमान तापमानात वाढ झाली आहे. मंगळवारी (ता. २४) सकाळी निफाड आणि उस्मानाबाद येथे १२.० अंश सेल्सिअसची सर्वांत कमी तापमानाची नोंद झाली आहे.  गेल्या आठवड्यात हवामान कोरडे असल्याने किमान तापमानात चांगलीच घट होऊन दहा अंश सेल्सिअसपर्यत तापमान खाली आले होते. मात्र, शनिवारी, रविवारी अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने राज्याच्या परिसरात असलेले हवेतील बाष्प खेचले गेल्याने पुन्हा हवामान ढगाळ झाले आहे.  नाशिक, पुणे, नगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या भागात गारठा कमी झाला आहे. त्यामुळे तापमानात पुन्हा वाढ झाली आहे. मात्र, निफाड तालुक्याच्या परिसरात किंचित गारठा असल्याने तापमान बारा अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे.   कोकणातील मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर परीसरात हवामान ढगाळ आहे. किमान तापमानात एक ते दोन अंश सेल्सिअसने वाढ झाली असून, किमान तापमान २२ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. मध्य महाराष्ट्रातील अनेक भागात गारठा चांगलाच कमी झाला आहे. त्यामुळे किमान तापमान १२ ते १९ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. मराठवाड्यातही ढगाळ हवामानामुळे गारठा गायब झाला आहे. किमान तापमान १२ ते १८ अंश सेल्सिअसपर्यंत होते. विदर्भातील अनेक भागात गारठा  कमी झाला आहे. यामुळे चंद्रपूर, नागपूर, गोंदिया, अमरावती, वर्धा, यवतमाळ या भागातील तापमान १५ ते १८ अशं सेल्सिअसच्या दरम्यान तापमान होते.   मंगळवारी (ता. २४) सकाळी आठ वाजेपर्यतच्या चोवीस तासांतील विविध ठिकाणचे किमान तापमान, अंश सेल्सिअसमध्ये, कंसात वाढ, घट ः  अकोला १६.१ (३), अलिबाग २२.८ (४), अमरावती १७.८ (३), औरंगाबाद १५.२ (४), बीड १८.० (६), बुलढाणा १७.० (३), चंद्रपूर १५.२ (२), डहाणू २२.२ (४), गोंदिया १४.४(२), जळगाव १८.६ (७), कोल्हापूर १९.६ (५), महाबळेश्वर १५.४ (२), मालेगाव १८.२ (७), मुंबई २२.३ (४),  नागपूर १४.७ (२), नांदेड १५.० (३), नाशिक १७.० (५), निफाड १२.०, उस्मानाबाद १२.७ (-१), परभणी १६.४ (३), लोहगाव १८.२ (७), पाषाण १७.४ (६), पुणे १७.१ (६), रत्नागिरी २२.८ (३), सांगली १९.३ (५), सातारा १७.५ (५), सोलापूर १८.६ (३), ठाणे २३.०, वर्धा १६.६ (३), यवतमाळ १८.४ (४).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update : अकोला, सोलापुरात हंगामातील उच्चांकी तापमान

Indian Politics : चीनवरून काँग्रेसचा मोदी सरकारवर पुन्हा हल्लाबोल

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

SCROLL FOR NEXT