कोकणात आज अतिवृष्टीचा इशारा
कोकणात आज अतिवृष्टीचा इशारा  
मुख्य बातम्या

कोकणात आज अतिवृष्टीचा इशारा

टीम अॅग्रोवन

पुणे : ‘वायू’ चक्रीवादळामुळे अरबी समुद्रात ढगांची दाटी झाली आहे. वादळामुळे पश्चिम किनाऱ्यावर वादळी वारे, उंच लाट उसळून मुसळधार पावसाची शक्यता आहे. आज (ता. १२) कोकणात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा असून, मध्य महाराष्ट्र, विदर्भात मेघगर्जना, विजांसह वादळी पावसाचा अंदाज आहे. तर विदर्भ आणि मराठवाड्यात उष्ण लाटेची शक्यताही हवामान विभागाने वर्तविली आहे.  सोमवारी (ता.१०) नाशिक जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यात सिन्नर, मालेगाव, येवला, निफाड वादळी वाऱ्यासह जिल्ह्यात संततधार पाऊस  पडला. वादळामुळे शेतीमालाचे मोठे नुकसान झाले, तर द्राक्ष बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. मराठवाड्यातील बीड, औरंगाबाद, परभणी जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. फूलंब्री तालुक्‍यातील खामखेडा येथे शेतात वीज पडून ज्येष्ठ महिला ठार झाली. भालगाव (ता. गंगापूर) शिवारात वीज पडून चार शेळ्या दगावल्या. पुण्यातील जुन्नर, खेड, मावळ, मुळशी, आणि भोर तालुक्यासह जिल्ह्याच्या विविध भागांसह धरणांच्या पाणलोटात वादळी पावसाने हजेरी लावली. वादळी पावसामुळे जुन्नर तालुक्यातील शिंदेवाडी येथे जनावरांसाठी सुरू करण्यात आलेल्या छावणीचे नुकसान झाले. नगर शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागांत सोमवारी दुपारनंतर जोरदार पाऊस झाला. सातारा तालुक्यातील शेंद्रे परिसरात दमदार वादळी पाऊस झाला. आज (ता.१२) कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. तर रायगडमध्ये जोरदार तर पालघर, ठाणे, मुंबईही पावसाचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर आणि मराठवाड्यातील परभणी, बीड, नांदेड, लातूर, उस्मानाबाद आणि विदर्भातही काही ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.   दरम्यान पूर्वमोसमी पावसामुळे राज्याच्या तापमानात चढ-उतार सुरू आहे. मंगळवारी (ता.११) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील जवळपास सर्वच ठिकाणी उष्ण लाट होती. ब्रह्मपुरी येथे ४६.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर चंद्रपूर, नागपूर येथे तापमान ४६ अंशांपेक्षा अधिक होते. तर राजस्थानच्या चुरू येथे देशातील यंदाच्या हंगामातील सर्वाधिक ५०.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.  मंगळवारी (ता. ११) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३५.६ (३.४), जळगाव ४२.४ (३.४), कोल्हापूर ३४.८(४.३), महाबळेश्वर २७.८ (४.५), मालेगाव ४२.४ (६.०), नाशिक ३६.३ (२.३), सांगली ३५.४ (३.५), सातारा ३५.२ (४.३), सोलापूर ३७.६ (२.१), अलिबाग ३५.० (३.०), डहाणू ३४.० (०.६), सांताक्रूझ ३५.६ (३.०), रत्नागिरी ३५.१ (४.४), औरंगाबाद ३९.२ (३.९), परभणी ४२.६ (५.३), नांदेड ४२.० (४.४), अकोला ४४.१ (५.७), अमरावती ४३.८ (५.४), बुलडाणा ४१.६ (६.६), ब्रह्मपुरी ४६.७ (८.०), चंद्रपूर ४६.०(६.९), गोंदिया ४२.०(२.५), नागपूर ४६.० (६.९), वर्धा ४५.५ (७.३), यवतमाळ ४३.०(४.९).   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sankeshwar Banda Highway : संकेश्वर-बांदा महामार्गावरील शेकडो झाडांची कत्तल; पण लागवड कधी?

Sericulture Farming : रेशीम शेतीतून जणू महिन्याचा सक्षम पगार

Heat wave : झारखंड शिक्षण विभागाचा आदेश; उष्णतेच्या लाटेमुळे आजपासून ८ वी पर्यंतचे वर्ग बंद

Success Story : पाणी पुरवठा संस्थांद्वारे मांडकी झाले जलस्वयंपूर्ण

Kolhapur Kharip Crop : यंदा पाऊस चांगला! खरिपाच्या क्षेत्रात होणार वाढ, धुळवाफ पेरणीची तयारी

SCROLL FOR NEXT