Hawaman
Hawaman  
मुख्य बातम्या

कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर शक्य  

टीम अॅग्रोवन

पुणे: मॉन्सून सक्रिय होण्यास पोषक हवामान होत असल्याने राज्यात आजपासून (ता.१३) पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याचा, तर विदर्भ, मराठवाड्यातही काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.   गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या अनेक भागात पावसाने उघडीप दिली आहे. तर कोकण घाटमाथ्यावर सुरू असलेला पाऊसही ओसरला आहे. रविवारी (ता.१२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून, वेंगुर्ला येथे सर्वाधिक १४१ मिलिमीटर, सावंतवाडी येथे १३४ मिलिमीटर, तर कुडाळ ११५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. कोकणात पावसाने हलक्या ते मध्यम स्वरुपाची हजेरी लावली असली तरी उर्वरित महाराष्ट्रात मात्र पावसाची उघडीप होती.   मॉन्सूनचा आस असलेल्या कमी दाब पट्टा राजस्थानच्या गंगानगरपासून उत्तर प्रदेशपर्यंत विस्तारला असून, पूर्व भाग हिमालयाच्या पायथ्याकडे सरकला आहे. बिहार आणि परिसरावरील चक्राकार वाऱ्यांची स्थिती, गोव्यापासून केरळपर्यंत असलेला हवेचा कमी दाबाचा पट्टा यामुळे राज्यात पावसाला पोषक हवामान होत आहे. आज (ता. १३) सिंधुदुर्ग, रत्नागिरीत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर रायगड, रत्नागिरी, ठाणे, पालघर, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार सरी पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.    

रविवारी (ता.१२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये  पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्त्रोत : हवामान विभाग)  कोकण : वसई ५६, विक्रमगड ३१, अलिबाग ३१, मुरूड ८४, रोहा ३३, श्रीवर्धन ३२, तळा ७१, गुहागर ३८, रत्नागिरी ३१, देवगड ४८, दोडामार्ग ३३, कणकवली ४६, कुडाळ ११५, मालवण ७२, सावंतवाडी १३४, वेंगुर्ला १४१, शहापूर ३४. मध्य महाराष्ट्र : ओझरखेडा ३०. मराठवाडा : भोकर २०.  विदर्भ : भामरागड ३३.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT