राज्यात शुक्रवारपासून पावसाचा अंदाज
राज्यात शुक्रवारपासून पावसाचा अंदाज 
मुख्य बातम्या

राज्यात शुक्रवारपासून पावसाचा अंदाज

टीम अॅग्रोवन

पुणे : वायव्य भारतातील पश्चिमी चक्रावाताची तीव्रता अधिक असल्याने उत्तरेकडील थंड वाऱ्याचे प्रवाह कमी झाले आहेत. राज्यात बहुतांशी ठिकाणी किमान तापमानात वाढ झाल्याने थंडी कमी झाली आहे. मंगळवारपर्यंत (ता. २२) राज्यातील गारठा कमी होण्याची शक्यता आहे. तर पश्चिमेकडील आणि पूर्वेकडील वाऱ्यांच्या परस्परविरोधी क्रियेमुळे शुक्रवार (ता. २५) नंतर महाराष्ट्रासह मध्य भारतात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.  पाकिस्तान, जम्मू काश्मिर आणि हिमालय पर्वतालगतच्या भागात तीव्र पश्चिमी चक्रावात सक्रीय आहे. वायव्य भारतात जमिनीलगत जोरदार वारे वाहणार आहेत. उत्तर भारतामध्ये जोरदार हिमवृष्टी होत असून, पंजाब, हरियाणा, उत्तर राजस्थान आणि पश्चिम उत्तर प्रदेशात गारपीट होण्याची शक्यता आहे.  उत्तरेकडील वाऱ्यांना अडथळा निर्माण झाल्याने महाराष्ट्रासह देशाच्या मध्य, पश्चिम व वायव्य भागाच्या किमान तापमानात २ ते ३ अंशांची वाढ होण्याचा अंदाज आहे. उत्तरेकडून येणारे वारे कमी झाल्याने, तसेच बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या वाऱ्यांमुळे राज्याच्या तापमानात वाढ होत आहे. रविवारी (ता. २०) धुळे येथील कृषी महाविद्यालयात नीचांकी ७.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. निफाड येथे रविवारी ९.२ अंश, नागपूर येथे ८.८ अंश, तर गोंदिया येथे ९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. नागपुरात थंडीचा कडाका अधिक आहे. तर उर्वरित राज्यात गारठा कमी झाला आहे. मंगळवारपर्यंत किमान तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. 

रविवारी (ता. २०) सकाळी राज्यातील विविध ठिकाणचे किमान तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत तफावत (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे १२.२(०.८), जळगाव १२.२ (०.३), कोल्हापूर १६.६(१.३), महाबळेश्‍वर १५.५(१.४), मालेगाव १२.६ (१.९), नाशिक ११.२, सांगली १३.१ (-१.२), सातारा १३.२ (०.०), सोलापूर १५.५(-०.७), सांताक्रुझ १७.९(०.७), अलिबाग १८.८(१.३), रत्नागिरी १८.३(-०.८), डहाणू १७.४(०.३), आैरंगाबाद १२.०(-०.३), परभणी ११.४ (-३.०), नांदेड १२.० (-१.९), अकोला ११.२(-३.२), अमरावती १२.२(-२.६), बुलडाणा १५.० (०.१), चंद्रपूर १३.२(-२.१), गोंदिया ९.०(-४.१), नागपूर ८.३(-५.४), वर्धा १२.०(-१.८), यवतमाळ १२.४(-३.०).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Season : देशातील साखर हंगाम अंतिम टप्प्यात

Weather Update : कोकणात उन्हाचा चटका ठरणार तापदायक

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

SCROLL FOR NEXT