hawaman
hawaman 
मुख्य बातम्या

मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मेघर्गनेसह पावसाचा अंदाज 

सकाळ वृत्तसेवा

पुणे : राज्यात उन्हाचा चटका चांगला वाढला आहे. शुक्रवारी (ता.१७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील अकोला येथे राज्यातील उच्चांकी ४३.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या काही तालुक्यात विजांच्या कडकडाटात वादळी पावसाने हजेरी लावली. आज (ता.१८) मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी पावसाची शक्यता आहे. तर कोकण, आणि विदर्भातही हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.  विदर्भ मराठवाड्यात सर्वच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तापमान चाळीशीच्या वर गेले आहे. अकोला येथे देशातील उंच्चाकी व महाराष्ट्रातील यंदाच्या हंगामातील सर्वाधिक ४३.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. धुळे, जळगाव, वाशिम चंद्रपूर येथेही तापमान ४२ अंशांच्या पुढे आहे. राज्यात उन्हाचा चटका तापदायक ठरत असून, दिवससह रात्रीही उकाड्यात मोठी वाढ होत आहे. कमाल तापमान व उकाड्यात झालेली वाढ कायम राहण्याची शक्यता आहे.  मध्य प्रदेशापासून विदर्भ, तेलंगणा, तामिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारला असून, अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरावरून बाष्पाचा पुरवठा होत असल्याने राज्यात दुपारनंतर ढगाळ हवामान होत आहे. पावसाला पोषक हवामान असल्याने राज्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. आज (ता.१८) मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.  शुक्रवारी (ता. १७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ४०.१, जळगाव ४२.६, धुळे ४२.०, कोल्हापूर ३५.८, महाबळेश्‍वर ३०.७, मालेगाव ४१.६, नाशिक ३९.०, निफाड ३९.०, सांगली ३७.६, सातारा ३७.६, सोलापूर ४१.०, डहाणू ३४.२, सांताक्रूझ ३४.३, रत्नागिरी ३३.८, औरंगाबाद ४०.८, बीड ४१.२, परभणी ४१.८, अकोला ४३.९, अमरावती ४१.२, बुलडाणा ४०.२, ब्रह्मपुरी ४१.०, चंद्रपूर ४२.०, गोंदिया ४०.८, नागपूर ४१.६, वाशीम ४२.२, वर्धा ४१.५. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Care : वाढत्या उष्णतेचा पशुधनास फटका

Public Well Policy : सार्वजनिक विहिरींच्या पुनरुज्जीवनावर धोरण काय?

Agriculture Irrigation : ‘म्हैसाळ’चे पाणी माडग्याळ शिवारात

Jalgaon Lok Sabha : ...तर जळगावचे चार खासदार पोहोचतील लोकसभेत

Banana Orchard Burn : सातपुड्याच्या पायथ्याशी केळी बागा करपल्या

SCROLL FOR NEXT