सोमवारी (ता.१७) अकोला तालुक्यातील आपातापा परिसरात दुपारी जोरदार पाऊस झाला.
सोमवारी (ता.१७) अकोला तालुक्यातील आपातापा परिसरात दुपारी जोरदार पाऊस झाला.  
मुख्य बातम्या

तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता

टीम अॅग्रोवन

पुणे : पोषक हवामान तयार झाल्याने रविवारी (ता. १६) दुपारपासून राज्यात पावसाला सुरवात झाली आहे. सोमवारी (ता. १७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नगर, सातारा, सोलापूरसह मध्य महाराष्ट्र आणि जालना, बीड, उस्मानाबादसह मराठवाड्यातही काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. साेमवारी सकाळपासून विदर्भ, मराठवाड्यात पावसाला सुरवात झाली होती. आज (ता. १८) राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.  पूर्वमध्य बंगालच्या उपसागरात समुद्र सपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाहणाऱ्या या वाऱ्यांमुळे आज (ता. १८) या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार आहे. अोडिशा, आंध्र प्रदेशकडे सकरत असलेली ही प्रणाली गुरुवारपर्यंत (ता. २०) आणखी तीव्र होणार आहे. समुद्र खवळणार असल्याने ओडिशा अाणि पश्‍चिम बंगालच्या किनाऱ्यालगतच्या समुद्रात मासेमारीसाठी न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा विरून गेल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे.  बंगालच्या उपसागरातील संभाव्य कमी दाबाचे क्षेत्र ओडिशा, छत्तीसगड, मध्य प्रदेशावरून वायव्येकेडे सरकणार असल्याने २१ ते २५ सप्टेंबर या कालावधीत महाराष्ट्रासह मध्य आणि दक्षिण भारतातील राज्यात पावसाचा जोर धरण्याचा अंदाज आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये असलेल्या चक्राकार वाऱ्यांमुळे ५.८ किलोमीटर उंचीवर आणखी एक चक्राकार वाऱ्यांची स्थिती सक्रिय असल्याने राज्यासह दक्षिण भारतात पाऊस पडत आहे. राज्याच्या तापमानातही चढ-उतार होत असून, चंद्रपूर येथे उच्चांकी ३५.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. 

सोमवारी (ता. १७) राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस मिलिमीटरमध्ये (स्त्रोत : कृषी विभाग) :    कोकण : अलिबाग १६, रामरज १२, खामगाव १४, कळकवणे १७.   मध्य महाराष्ट्र : इगतपुरी ४१, साक्री १७, कसारे १२, रोषणमाळ १३, चुलवड १०, खुंटामोडी १५, रावेर ११, चोपडा २९, भडगाव १९, वाकी १४, भाळवणी १३, सुपा १४, पळशी १०, कर्जत ४५, कोंभळी १४, ढोर जळगाव २३, मिरी २०, चांदा ५०, घोडेगाव ४९, सोनई ३१, वडाळा ३१, ब्राह्मणी ८३, समनापूर १०, पिंपरणे २१, टाकळीभान २०, शिर्डी १५, लोणी ११, बाभळेश्‍वर १८, पणदरे ११, लोणी १०, काटी १०, होटगी ३५, आगळगाव १६, टेंभुर्णी ३२, करमाळा ११, जेऊर ३५, कोर्टी २०, उमरड १७, बामणोली ४६, मायणी २५, निमसोड २६, कातरखटाव ५८, दहिवडी २५, मलवडी ३८, गोंदावले ४०, कुक्‍कुडवाड ३२, मार्डी २४, लामज १२, कुंभारी १८, लेंगरे ४५, विटा २७, येळवी १८, आटपाडी १४.   मराठवाडा : पाचोड १०, चिंचोली ११, करंजखेड २२, शेवळी १२, परतूर १२, सातोणा ३५, ढोकसळ, पाटोदा ३८, दासखेड १८, नळगीर १३, सालगारा १९, सावरगाव २१, जावळा २५, मानकेश्‍वर ३४, वालवड १०, चुडवा २६.    विदर्भ : मेहकर ११, अंजनी १३, साखरखेर्डा १०, मंगरूळ १३.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Elephant Issue in Germany : हत्तींवरून दोन देशांमध्ये रणकंदन

Nainital forest fires : नैनितालच्या जंगलात आग; अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द करण्याचे मुख्यमंत्री धामी यांचे आदेश

The Economist : इकॉनॉमिस्टच्या नजरेतून दक्षिण व उत्तर भारत

Urja Bio System : शाश्‍वत ऊर्जेसाठी ‘ऊर्जा बायो सिस्टिम प्रा. लि.’ची साथ

Crop Insurance : पीकविम्याचे बदल शेतकऱ्यांच्या किती फायद्याचे?

SCROLL FOR NEXT