मराठवाडा, विदर्भात आज, उद्या पाऊस 
मराठवाडा, विदर्भात आज, उद्या पाऊस  
मुख्य बातम्या

मराठवाडा, विदर्भात आज, उद्या पाऊस 

टीम अॅग्रोवन

पुणे : आज (ता.१२) विदर्भात बऱ्याच ठिकाणी, मराठवाड्यात काही ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. उद्या (ता.१३) मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. उर्वरित भागात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. बुधवारपासून (ता.१४) गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. पुणे परिसरातही आकाश निरभ्र राहण्याचा अंदाज आहे.  

गेल्या दोन दिवसापासून राज्यातील काही भागात ढगाळ हवामान होते. त्यामुळे मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली. कोकण, गोवा व विदर्भाच्या काही भागात तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय, मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. मध्य महाराष्ट्रातील निफाड येथे ११.० अंश सेल्सिअसची सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली आहे. 

रविवारी (ता.१२) सकाळी आठ वाजेपर्यतचे किमान तापमान व कंसात झालेली घट (अंश सेल्सिअस)  : मुंबई (सांताक्रुझ) १७.८, अलिबाग १८.६, रत्नागिरी १७.३, भिरा १६.०, डहाणू १७.६, पुणे १३.३, जळगाव १२.०, कोल्हापूर १८.१, महाबळेश्वर १५.७, मालेगाव १४.५ , नाशिक १२.३, निफाड ११.०, सांगली १६.१, सातारा १४.०, सोलापूर १८.२, औरंगाबाद १४.६, परभणी (कृषी विद्यापीठ परिसर) १२.५, परभणी शहर १३.९, उस्मानाबाद १३.६, अकोला १७.३, अमरावती १५.४, बुलढाणा १६.४, चंद्रपूर १८.४, गोंदिया १५.०, नागपूर १५.५, वर्धा १७.५, यवतमाळ १९.०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : विदर्भात गारपीटीचा अंदाज; राज्यातील विविध भागात पुढील ५ दिवस पावसाचा अंदाज

Sugar Price Hike : ऐन निवडणुकीत साखरेच्या दरात तेजी, क्विंटलचा दर वाढल्याचा कोणाला फायदा?

Animal Ear Tagging : जनावरांचे टॅगिंग न केल्यास खरेदी-विक्रीला रोख लागणार

Unseasonal Rain : अवकाळी पावसाने नागपूर, भंडारा आणि चंद्रपुरात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान 

Chilli Cultivation : धाड परिसरात शेकडो हेक्टरवर यंदा झाली मिरचीची लागवड

SCROLL FOR NEXT