उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यांत पावसाची हजेरी
उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यांत पावसाची हजेरी 
मुख्य बातम्या

उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यांत पावसाने पीक नुकसान

टीम अॅग्रोवन

उस्मानाबाद/लातूर : दोन्ही जिल्ह्यांतील जवळपास ३७ मंडळांत बुधवारी (ता. ३) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत काही ठिकाणी हलका, मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लागली. चार मंडळांत ६५ मिलिमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. हा पाऊस पडलेल्या भागातील शेतकऱ्यांच्या रब्बीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर परतीच्या पावसाची सार्वत्रिक कृपा अजूनही व्हायला तयार नाही. कुठे अपेक्षेच्या पुढे जावून तर कुठे थेंबही नाही. अशा लहरी स्वरूपातच परतीचा पाऊसही पडत असल्याची प्रचिती लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी बुधवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत अनुभवली.

लातूर जिल्ह्यातील लातूर तालुका, हरंगुळ बु. मंडळात प्रत्येकी ३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. औसा तालुक्‍यातील भादा मंडळांत सर्वाधिक ६८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यापाठोपाठ औसा ५५, लामजना ३२, किल्लारी ३, मातोळा ४८, किनथोट २०, बेलकुंड ८, उदगीर तालुक्‍यातील मोधा ७, हेर ५, देवर्जन ३, वाढवणा बु. ४, चाकूर तालुक्‍यातील चाकूर ४, वडवळ ना. २, नळेगाव ३६, निलंगा तालुक्‍यातील निलंगा मंडळात ५८, अंबुलगा बु. ४, कासरशिरसी ५, पानचिंचोली २१, देवणी बु. ५, शिरूर अनंतपाळ तालुक्‍यातील शिरूर अनंतपाळ ५, साकोळ मंडळात २ मिलिमीटर पाऊस झाला. उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद शहर मंडळात ५१ मिलिमीटर, उस्मानाबाद ग्रामीण १४, तेर २३, ढोकी २५, बेम्बाळी ४१, पाडोळी ७२, जागजी ८, केशेगाव ३३, तुळजापूर ८५, सावरगाव ३१, नळदुर्ग ५, मंगरूळ १३०, सालगरा १७, नारगवाडी ७, मुळज ७.

उस्मानाबाद जिल्ह्यात पावसाने नुकसान उस्मानाबाद ः उस्मानाबाद शहर व परिसरात आणि तुळजापूर तालुक्यात बुधवारी (ता. तीन) पहाटे जोरदार पाऊस झाला. तर ढोकी (ता. उस्मानाबाद) परिसरात मंगळवारी (ता. २) रात्री वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. मंगरुळ (ता. तुळजापूर) परिसरात सोयाबीन पिकाचे नुकसान झाले. ढोकी परिसरात उसाचे पीक आडवे झाले. केळीच्या बागांचेही नुकसान झाले. बुधवारी पहाटे तुळजापूर तालुक्यातील मंगरुळ महसूल मंडळात जोरदार पाऊस झाला. या मंडळात अतिवृष्टी झाली. १३० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तुळजापूर महसूल मंडळातही अतिवृष्टी झाली. ८५ मिलिमीटर पाऊस या मंडळात नोंदला गेला. उस्मानाबाद व तुळजापूर तालुका वगळता अन्य तालुक्यांत पाऊस झाला नाही.

सर्वाधिक पावसाची मंडळे (मिलिमीटरमध्ये)  औसा तालुका ः भादा ६८  उस्मानाबाद तालुका ः पाडोळी ७२  तुळजापूर तालुका ः मंगरूळ १३०, तुळजापूर  ८५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Poultry Disease : उन्हामुळे कुक्कुटपालनात मरतुकीचे प्रमाण वाढले

Sugar Commissionerate : साखर उपपदार्थ विभागाची सूत्रे देशमुख यांनी स्वीकारली

Loksabha Election 2024 : खडकवासला मतदार संघातील मतदान केंद्रांना साहित्याचे वितरण

Sugar Export Ban : साखर निर्यातबंदीमुळे ऊस उत्पादकांच्या स्वप्नांची माती

Banana Rate : खानदेशात केळी दरात मोठी घसरण

SCROLL FOR NEXT