राज्यात पावसाची दडी
राज्यात पावसाची दडी 
मुख्य बातम्या

राज्यात पावसाची दडी

टीम अॅग्रोवन

पुणे: पोषक हवामान नसल्याने राज्यात मॉन्सूनच्या पावसाने दडी मारली आहे. पुढील काही दिवस हीच स्थिती राहणार असून, मंगळवारपर्यंत राज्यात हलक्या पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची नोंद झाली. उर्वरित राज्यात पावसाने उघडीप दिली आहे.  पश्‍चिम उत्तर प्रदेश आणि परिसरावर असलेले हवेचे कमी दाबचे क्षेत्र, पंजाबच्या फिरोजपूरपासून कमी दाबाच्या केंद्रातून बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय असलेला मॉन्सूनचा आस यामुळे उत्तर भारतात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. तर पूर्व भारतातही ढगांची दाटी झाली आहे. महाराष्ट्रासह मध्य आणि दक्षिण भारतामध्ये मात्र हलके ढग असल्याने पावसाने दडी मारली आहे. दिवसभर ढगाळ हवामानाबरोबरच एक-दोन सरी वगळता राज्यात पावसाची उघडीप असल्याचे चित्र आहे.  पश्‍चिम बंगाल आणि परिसरावर समुद्रसपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वारे वाहत आहेत. या वाऱ्यांच्या प्रभावामुळे सोमवारपर्यंत (ता. ३०) या भागात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याचे संकेत असून, आजपासून (ता. २८) ईशान्य भारतामध्ये पावसाचा प्रमाण वाढणार आहे. मंगळवारपर्यंत (ता. ३१) कोकणात अनेक ठिकाणी, तर उर्वरित महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या  सरींची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.  शुक्रवारी (ता. २७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये - स्रोत कृषी विभाग) :  कोकण : चिपळूण २७, मार्गतम्हाणे २२, सावर्डे २६, कळकवणे ३७, शिरगाव ७२, पटपन्हाले ३५, मंडणगड ३०, म्हाप्रल ३३, देव्हरे २७, फुंगुस २१, सवंडल ३४, नाटे २२, सातवली २२, विलवडे २०. मध्य महाराष्ट्र : इगतपुरी २१, शेंडी २४, मुठे २५, भोलावडे २२, हेळवाक २८, महाबळेश्‍वर २६, तापोळा २८, लामज ४७, चरण ३०, करंजफेन २८, आंबा ६०, राधानगरी २२, साळवण ७५. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT