crop damage
crop damage 
मुख्य बातम्या

'पूर्वमोसमी'चा ठिकठिकाणी पुन्हा कहर

टीम अॅग्रोवन

औरंगाबाद ः मराठवाडा आणि विदर्भात ठिकठिकाणी बुधवारी (ता. १८) रात्री आणि गुरुवारी (ता.१९) पहाटे वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह पूर्वमोसमी पाऊस आणि गारपीट झाली. मराठवाडा आणि विदर्भातील बुलडाणा, अकोला आणि वाशीम जिल्ह्यांत ठिकठिकाणी पाऊस आणि गारपीट झाली. यामुळे गहू, हरभरा, कांदा, कलिंगड, खरबूज, भाजीपाला, फळबागा पिकांचे मोठे नुकसान झाले.   मराठवाड्यात अवकाळी पावसाचा कहर सतत तीन दिवसांपासून कायम आहे. औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यांतील जवळपास ६० पेक्षा जास्त मंडळात अवकाळी पाऊस झाला. काही मंडळात गारपीट तर काही मंडळात विजांचा कडकडाट व वादळासह पाऊस असं या पावसाचा स्वरूप होतं. काढणीला आलेली आणि सोंगून ठेवलेल्या पिकांचं पावसाने व गारपिटीने मोठे नुकसान झालं. आंब्यासह द्राक्ष व इतर फळपिकांनाही मोठा फटका या अवकाळी पावसाचा बसतो आहे.  वऱ्हाडात मंगळवारी झालेल्या पूर्वमोसमी पाऊस, गारपीट आणि वादळामुळे सुमारे ४० हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. याबाबत प्रशासनाकडून वरिष्ठांकडे एक अहवाल तातडीने पाठविण्यात आला. या नुकसानात एकट्या बुलडाणा जिल्ह्यातच ३५ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील पिके उद्ध्वस्त झाल्याचे समोर आले आहे.  बुलडाणा जिल्ह्यात मंगळवारी दुपारनंतर विविध भागांत पाऊस, वादळी वारा आणि गारपीट झाली. या आपत्तीत २९६ गावांतील ३४ हजार ८०८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अहवाल समोर आला आहे.  गारपिटीचा फटका

  • वऱ्हाडात ४० हजार हेक्टरला तडाखा  
  • मांडखेल (ता. परळी) येथे वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू  
  • सावरगाव (ता. तुळजापूर) येथे द्राक्ष बागा आडव्या  
  • मंठा परिसरात गारपीट    
  • परभणी जिल्ह्यांत २९ मंडळात पाऊस
  • नुकसान झालेली पिके  गहू, ज्वारी, हरभरा, मका, संत्रा, मोसंबी, पपई, द्राक्ष, कांदा, लिंबू, केळी, भुईमूग, कलिंगड, खरबूज, भाजीपाला, फळबागा 

    प्रतिक्रिया मोठ्या मेहनतीने व खर्च करून भाजीपाला व टरबुजाचे पीक घेतले असून पिकाची वाढ चांगली झाली आहे. तर टरबूज चांगले मोठ मोठे झाले होते. परंतु, गारपिटीने सर्व होत्याचे नव्हते केले आहे. शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत करावी.  — उदयसिंह बोराडे, शेतकरी, मंठा  

    गुरुवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास आमच्या गावात बोराच्या आकाराच्या गारा पडल्या. गहू, ज्वारी, हरभऱ्यासह, भाजीपाला पिकांचे नुकसान झाले.  — गोपाल गिराम,  ब्रम्हपुरी, ता. परभणी. 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

    Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

    Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

    Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

    Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

    SCROLL FOR NEXT