संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

सातारा जिल्ह्यातील पश्‍चिम भागात संततधार

टीम अॅग्रोवन

सातारा  ः जिल्ह्याच्या पश्‍चिमेकडील महाबळेश्वर, पाटण, जावळी, सातारा या तालुक्‍यात संततधार पाऊस झाला असून, अधूनमधून पावसाच्या दमदार सरी कोसळत आहेत. यामुळे शेतात पाणी साचून राहत आहे. जिल्ह्यात शुक्रवारी (ता. १३) सकाळी आठ वाजेपर्यंत सरासरी ३२.७७ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

महाबळेश्वर, पाटण, जावळी, सातारा या चार तालुक्‍यांत पावसाचे प्रमाण जास्त आहे. या तालुक्‍यातील अनेक ठिकाणी जोरदार सरी कोसळत आहेत. या चारही तालुक्‍यात सरासरी ४० मि.मी.पेक्षा जास्त पाऊस झाला आहे. यामुळे भात लागवडी व्यतिरिक्‍त शेतातील बहुतांशी कामे बंद आहेत. गुरुवारी रात्रीही काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे. कराड, कोरेगाव, खटाव व वाई तालुक्‍यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे.

माण, खंडाळा या तालुक्‍यात अल्प प्रमाणात पाऊस सुरू आहे. मात्र फलटण तालुक्‍यात पावसाची वक्रदृष्टी असून या तालुक्‍यात पावसाअभावी पिके धोक्‍यात येऊ लागली आहेत. पाटण, कराड  तालुक्‍यात भात लागवडीस वेग येऊ लागला आहे. पावसाच्या आगमनामुळे पिकांची जोमदार वाढ सुरू झाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Season : देशातील साखर हंगाम अंतिम टप्प्यात

Weather Update : कोकणात उन्हाचा चटका ठरणार तापदायक

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

SCROLL FOR NEXT