Rain in 231 circles in Marathwada
Rain in 231 circles in Marathwada 
मुख्य बातम्या

मराठवाड्यातील २३१ मंडलांत पाऊस

टीम अॅग्रोवन

परभणी ः मराठवाड्यातील २३१ मंडलांत बुधवारी (ता. ६) सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांमध्ये हलका ते जोरदार पाऊस झाला. 

औरंगाबाद जिल्ह्यातील ३४ मंडलांत सरासरी ५.९ मिलिमीटर पाऊस झाला. पैठण, गंगापूर, वैजापूर, औरंगाबाद तालुक्यांतील अनेक मंडलांत जोरदार पाऊस झाला. जालना जिल्ह्यातील ३२ मंडलांत सरासरी ८.२ मिलिमीटर पाऊस झाला. अंबड, परतूर, घनसावंगी, मंठा, बदनापूर, जालना तालुक्यांतील मंडलात पाऊस झाला. 

परभणी जिल्ह्यातील ३७ मंडलांमध्ये सरासरी ३.९ मिलिमीटर पाऊस झाला. सेलू, परभणी, जिंतूर तालुक्यांतील मंडलांमध्ये हलका ते जोरदार पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यातील १३ मंडलांत सरासरी १.२ मिलिमीटर पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यातील २६ मंडलांत सरासरी १ मिलिमीटर हलका ते मध्यम पाऊस झाला. लातूर जिल्ह्यातील ४६ मंडलांत सरासरी ४ मिलिमीटर हलका ते मध्यम पाऊस झाला. उस्मानाबाद जिल्ह्यातील ८ मंडलांत सरासरी १ मिलिमीटर पाऊस झाला. बीड जिल्ह्यातील ३५ मंडलांमध्ये सरासरी ३.४ मिलिमीटर पाऊस झाला.

मंडलनिहाय पाऊस  (१५ मिलिमीटरच्या पुढे) औरंगाबाद जिल्हा ः आडूळ १७, बिडकीन ३६.३, विहामांडवा २३.८, वाळूज १७, हरसूल २७.८, सिद्धनाथ २६.३. जालना जिल्हा ः अंबड २६, धनगरपिंपरी २६.३, रोहिलगड २६.५, गोंधी २७, वडीगोद्री ३०.३, सुखापुरी २२.८, परतूर २०.५, घनसावंगी १५.८, राणीउंचेगाव २५, तीर्थपुरी ३७.८,  कुंभार पिंपळगाव १९.८, आंतरवाली १६,  मंठा १५.८. परभणी जिल्हा  ः मोरेगाव ३०. नांदेड जिल्हा ः वसरणी १६.८. बीड जिल्हा ः जातेगाव १९.३, उमापूर ३८.८, तलवाडा २२, नागापूर २१.३.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Delhi Farmers' protest : भाजपच्या उमेदवारांविरोधात पंजाबमध्ये शेतकऱ्यांचा रोष वाढला; एसकेएमचा विरोध कायम

Lok Sabha Constituency : कोल्हापूर जिल्ह्यातील ३७ लाख ५० हजार मतदारांचा कौल कोणाला? मतदान केंद्रे सज्ज

Fire in Nainital : उत्तराखंडच्या जंगलातील आग पोहचली शेताच्या बांधावर, एका महिलेचा होरपळून मृत्यू

Animal Ear Tagging : ...अन्यथा भरपाई अन् अनुदान नाही

Sunburn Crop : कोवळी रोपे वाचविण्यासाठी शेतकरी सरसावला

SCROLL FOR NEXT