मुख्य बातम्या

अामदार राहुल बोंद्रेंसह कार्यकर्त्यांना अटक, सुटका

टीम अॅग्रोवन

बुलडाणा : रब्बी हंगामात शेतकऱ्यांची वीज तोडल्याने अामदार राहुल बोंद्रे व कार्यकर्त्यांनी चिखली तालुक्यातील केळवद वीज कार्यालयात जाळपोळ केली होती. या प्रकरणी दाखल तक्रारीवरून अामदार बोंद्रे व कार्यकर्त्यांना बुधवारी (ता. २७) पोलिसांनी अटक करून न्यायालयासमोर हजर केले. त्यानंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली.

केळवद परिसरातील गावांमध्ये वीज कंपनीने पूर्वसूचनेशिवाय वीजपुरवठा खंडित केल्यानंतर मंगळवारी (ता. २६) रात्री जाळपोळ झाली होती. या प्रकरणी कनिष्ठ अभियंता प्रफुल्ल चितोडे यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार चिखली पोलिसांनी आमदार राहुल बोंद्रे यांच्यासह ९ जणांविरुद्ध शासकीय मालमत्तेचे नुकसान करणे, शासकीय कामात अडथळा निर्माण करणे आणि जाळपोळ करणे या कारणाखाली गुन्हे दाखल केले हाेते. या प्रकरणी चिखली पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळल्यानंतर आमदार बोंद्रे यांनीही स्वतः पोलिस ठाण्यात जाऊन अटक करून घेतली होती. पोलिसांनी राहुल बोंद्रे यांच्यासह म. रिझवान सौदागर, रमेश रंगनाथ सुरडकर, संजय गिरी, किशोर साळवे, ज्ञानेश्‍वर गायकवाड, शेख अनसार, भगवानसिंग राजपूत, विशाल साळोक यांना अटक केली. पोलिसांनी या सर्वांना स्थानिक न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांची जामिनावर मुक्तता केली.

मलकापूर नगराध्यक्षांनाही जामीन मलकापूर तालुक्‍यातील जांबुळधाबा येथील वीज उपकेंद्राची तोडफोड आणि साहित्याची जाळपोळ केल्याप्रकरणी मलकापूरचे नगराध्यक्ष ॲड. हरीश रावळ व नऊ जणांना मंगळवारी (ता. २६) रात्री पोलिसांनी अटक केली. त्यांना बुलडाणा न्यायालयात बुधवारी हजर केले असता, न्यायालयाने गुरुवार (ता. २८)पर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली होती. गुरुवारी या अांदोलकांना न्यायालयाने जामीन दिला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Rate : वाढत्या उन्हामुळे साखरेला मागणी, दरातही वाढ

Food Security Scheme : अन्नसुरक्षा योजनेत पुरवल्या अप्रमाणित निविष्ठा

Jowar Market : पंचवीस हजार क्विंटल ज्वारीची कमी दराने विक्री

Heat Wave Maharashtra : उन्हाच्या चटक्याने राज्य होरपळले

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

SCROLL FOR NEXT